ताज्या घडामोडी

देशभरात सुरू असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साई गजानन मंडळ अमळनेरचा पारायण, महासत्संग, महाप्रसाद,पायी वारकरी शोभा ताईचा केला सन्मान

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील *देशभरात सुरू असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साई गजानन मंडळ अमळनेरचा पारायण, महासत्संग, महाप्रसाद,पायी वारकरी शोभा ताईचा केला सन्मान* अमळनेर येथे श्री साई गजानन परिवाराच्यावतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री सद्गुरु गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले त्या पारायणात अनेक भक्तांनी सहभाग नोंदवला पारायण आटोपल्यानंतर महा सत्संगाला सुरुवात झाली गजानन नामाचा जयघोष करत महा सत्संगात भक्ती गीते, भावगीते,गवळण व भारुड म्हणण्यात आले त्यात महिला भगिनींनी देखील सहभाग नोंदवला. पुढे सामुदायिक महाप्रसाद सर्वांना देण्यात आला महा सत्संगात पंढरपूरच्या पायी वारीला गेलेल्या सौ शोभा रमेश पाटील यांचा मंडळाच्या अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला वारीमध्ये किती आनंद असतो एक वेळा पंढरपूरची वारी सर्वांनी करावी अशाही सूचना त्यांनी दिल्यात वारी बाबत स्पष्टीकरण करताना त्या म्हणाल्या माझी तिसरी वारी पूर्ण झाली भगवंत कृपेने मला पाच वाऱ्या पूर्ण करायचा त्यांनी संकल्प केला शोभाताई यांनी वारीत असलेला अथांग जनसागर आणि त्या ठिकाणी सद्भावाने चालणारा वारकरी हेही प्रामुख्याने सांगितलं त्याचबरोबर श्री दिलीप एकनाथ पाटील सर यांनी व मंडळाचे सदस्य यांनी मंडळाचे अध्यक्ष वारी प्रमुख शिवाजीराव पाटील यांचा देखील ज्येष्ठतेनुरूप गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सन्मान केला त्यांना स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट देऊन पुस्तिका ग्रंथ व श्रीफळ देऊन सन्मान डी.ई पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला साई गजानन परिवाराने गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले त्यात खालील सदस्यांनी सहभाग नोंदवला
1 शिवाजी मोहन पाटील
2 शिरीष डहाळे सर
3 आर व्ही पाटील
4 सुभाष साळुंखे
5 जितेंद्र बोरसे
६ आर पी सैंदाणे
7 डी.ई पाटील
8 वाल्मीक मराठे पाटील सर दीपक पाटीक वावडे
9 योगिता दहाडे
10 शोभा रमेश पाटील
11 गणेश बोढरे सर
12 राजेंद्रशिंग वामन पाटील
13 भरतशिंग परदेशी सर
14 बोरसे ताई (जितेंद्र बोरसे )
१५ दिलीप खैरनार सर
16 मंगलताई सुरेश धनगर साहेब
17 भटू नारायण पा
18 मुकेश साळुंखे
19 चंद्रशेखर पाटील
20 ए टी पाटील
21 योगेशभाऊ ठिबक वाले
मग मा जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई कोषाध्यक्ष पूजाताई,भिकन पाटील, चुडामन पाटील, उपस्थित होते
गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुबंधूंनी एकमेकाला हार्दिक शुभेच्छा देऊन उपस्थित गुरुवंदन चे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??