ताज्या घडामोडी

शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करा,सरसकट कर्जमाफी करा:- राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे दिले निवेदन

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना जाहीर केली असून या योजनेतील जाचक अटी शर्ती बघता ही योजना म्हणजे कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे या जाचक अटींमुळे राज्यभरातील लाखो शेतकरी वंचित राहणार असल्याचे स्पष्ट आहे . गेली तीन वर्ष सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर, खतांचे वाढलेले भाव,यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कोणत्याही अटी शर्ती शिवाय सरसकट कर्जमाफी करण्याची राज्यभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तरी आपण याबाबत शासनास अवगत करावे व शेतकऱ्यांची मागणी शासनापर्यंत पोहोचवावी. अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.परिणामी संबंधित शासन निर्णय बदलण्याची मागणी अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माननीय तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देऊन केली आहे या निवेदनावर पक्षाचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील, शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अमळनेर नगरपालिका प्रशांत एम .निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, किसान सेल तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, शहर सरचिटणीस चिंधू ओंकार वानखेडे, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शांताराम भाऊ कोळी, तालुका उपाध्यक्ष वासुदेव मामा, दीपक जगन्नाथ पाटील वाघोदा , पंजाबराव पाटील अंचलवाडी यांच्या स्वाक्षरी आहेत

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??