भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने राबविण्यात येणारे “खेत बचाओ अभियान

मावळ तालुक्यातील सडवली गावांमध्ये उत्साहात संपन्न झाले. या मावळ तालुक्याच्या विविध गावांत “खेत बचाव अभियानांतर्गत गावांमध्ये शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी , यांचे सहकार्य लाभले.
देशभरात १ ते ३० जून या कालावधीत सुरू असलेल्या या अभियानांतर्गत केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, माटुंगा (मुंबई) येथे कार्यरत असलेले प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विष्णु अरुडे ,ए.बी.आय. मॅनेजर उदय कोरे, तांत्रिक अधिकारी संजय फाळके, डेअरी प्रोजेक्ट चे अमित चव्हाण ,व सडवली गाव चे ओझरकर, दाभाडे बदर,चौधरी,फाळके, साळुंखे,तुपे, पाटील म्हसुडगे असे कृषिभूषण शेतकरीवर्ग हजर होते व अमित चव्हाण, डेअरी कृषी सहायक तसेच उदय कोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. विष्णु अरुडे यांनी जमिनीचे आरोग्य, नैसर्गिक शेतीचे आर्थिक व आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व, शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय उभारताना केंद्र शासनाकडून उपलब्ध होणारे अर्थसहाय्य तसेच पीक नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. विष्णु अरुडे ( प्रमुख वैज्ञानिक) यांनी माती परीक्षणाचे महत्त्व आणि रासायनिक खतांचा कमी वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यांनी जैविक खते स्वतःच्या शेतात कशी तयार करावीत तसेच बायोगॅस निर्मितीबाबत माहिती यांनी जीवामृत, घनजीवामृत आणिजैविक कीटकनाशकांची निर्मिती व वापर याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या नैसर्गिक शेतीशी संबंधित अडचणी व समस्याही जाणून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी , कृषिमित्र आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.उदय कोरे यांनी सर्वांचे आभार मानले.



