
महाराजा प्रवीरचंद्र भंजदेव हे बस्तर चे 20 वे काकतीय वंशातील शेवटचे राजे होते. बस्तर येथील आदिवासी त्यांना देवा प्रमाणे अजुनही समजून पुजा करतात. प्रवीरचंद्र भंजदेव यांनी आदिवासींचे अधिकार व जल जंगल जमिन साठी जमीनदार व शासनासोबत संघर्ष केला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांनी बस्तर रियासत 1 जानेवारी 1948 रोजी भारतीय लोकतंत्र मध्ये विलिनीकरण करण्यासाठी हस्ताक्षर केले. 1957 मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून जगदलपूर विधान सभेचे आमदार म्हणून निवडून आले. परंतू आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाचे विरोधात त्यांनी 1959 मध्ये आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आदिवासींवर होत असलेल्या अत्याचार चे विरोधात लढा दिल्यामुळे 1961 मध्ये त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले.
शेवटी राजमहल मध्ये शरण आलेल्या आदिवासींवर पोलीसांनी गोळीबार करून ठार मारले त्यावेळेस प्रवीरचंद्र भंजदेव यांची सुदधा हत्या करण्यात आली
*”प्रवीरचंद्र भंजदेव यांच्या जीवनपटातील काही महत्वाचा घटनाक्रम”*
1. 25 जून 1929- प्रवीरचंद्र भंजदेव यांचा शिलांग मधये जन्म
2. 4 मार्च 1934 प्रवीर चे लहान भाऊ विजयचंद्र भंजदेव यांचा इंग्लंड मध्ये जन्म
3. 28 फरवरी 1936 प्रवीर चंद्र भंजदेव ची आई महाराणी प्रफुल्ल कुमारी यांचे इंग्लंड मध्ये देहावसन
4. 16 जुलै 1947 प्रवेशचंद्र भंजदेव यांचा विधिवत राज्याभिषेक
5. एक जानेवारी 1948 – बस्तर के रियासत चे लोकतंत्र मध्ये विलिनीकरण
6. 1952 शासन द्वारा प्रवीरचंद्र ची संपूर्ण संपत्ती जप्त करून कोर्ट ऑफ वॉर्ड ला सुपूर्द केल्याची शासनाद्वारे घोषणा
7. 1955 प्रवीण चंद्र द्वारा आदिवासी किसान मजदूर संघ ची स्थापना
8. 1957 प्रवीरचंद्र ची जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवड .
त्यानंतर सार्वजनिक निवडणूकीत जगदलपूर विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून निवड
9. 1957 प्रवीरचंद्र भंजदेव चे वडील प्रफुल्लचंद्र भंजदेव यांचे ओरिसा मध्ये निधन
10. *”1958 प्रवेशचंद्र भंजदेव द्वारा आदिवासी सेवा दल ची स्थापना”*
11. 1959 प्रवीरचंद्र भंजदेव द्वारा विधानसभा सदस्यत्व चा राजीनामा
12. 11 फरवरी 1961- धनपुंजी गाव मध्ये प्रवीरचंद्र ला अटक
13. 12 फरवरी 1961- शासन द्वारा प्रवीरचंद्र च्या चळवळी तसेच त्यांच्या काही वक्तव्याला शासन विरोधी समजून त्यांची मान्यता रद्द करने बाबत घोषणा
14. 27 मार्च 1961 तोकापाल भय्ये अश्रूगॅस कांड
15. 31 मार्च 1961 लोहण्डीगुडा तथा सिरिस गुडा मध्ये आदिवासी दवारा प्रदर्शन तथा प्रवीरचंद्र यांना मुक्त करण्याची मागणी. लोहण्डी गुडा मध्ये पोलीस द्वारा आदिवासी वर गोळीबार
16. 26 एप्रिल 1961 नरसिंह गड जेल मधून मुक्तता.
शासन द्वारा नियुक्त सल्लागार बोर्ड ने प्रवीरचंद्र भंजदेव ची अटक अवैध घोषित करण्यात आली .
17. 4 जुलै 1961 प्रवीरचंद्र यांचा पाटी पाटण ची राजकुमारी शुभराज कुमारी सोबत विवाह
18. प्रवीरचंद्र द्वारा महाराणी शुभराज कुमारी चे वेदवती म्हणून नामकरण
19. ऑक्टोंबर 1961 प्रवीरचंद्र यांनी 14 वर्षानंतर पुन्हा विधिवत रथारूढ होऊन दशहरा पर्वाचे नेतृत्व केले. त्यापूर्वी ते 1947 मध्ये दशहरा पर्वाचे वेळी शेवटचे रथारूढ झाले होते
20. नोव्हेंबर 1961 रवीरचंद्र द्वारे “राजा मंडई” चे पुन्हा आयोजन केले. राजा मंडई समारंभ 1937 पासून बंद होती
21. सितंबर 1961- प्रवीरचंद्र द्वारे “महाराजा पार्टी” ची स्थापना
22. फरवरी 1962 कांकेर तथा बीजापूर चे अतिरिक्त सर्व क्षेत्र मध्ये महाराजा पार्टी च्या उमेदवाराचा विजय
23. 6 ऑक्टोबर 1962 महाराणी वेदवती यांचे बस्तर आगमन
24. 8 एवं 9 ऑक्टोबर 1962 महाराजा प्रवीरचंद्र व वेदवती देवी दोन्ही रथारूढ होऊन दशहरा समारंभ चे नेतृत्व केले.
25. 8 मे 1963 जगदलपूर राज महाल मध्ये प्रवीरचंद्र ची संपत्ती कोर्ट ऑफ वार्ड कडून मुक्त करण्यासाठी आदिवासी द्वारा कोर्ट ऑफ वार्ड कार्यालय मे आक्रमण
26. 9 मे 1963 महाराणी वेदवती राज महल चा त्याग करून पाटण ला प्रस्थान
27. 10 मे 1963 मध्यप्रदेश शासन द्वारा प्रवीरचंद्र ची संपत्ती कोर्ट ऑफ वार्ड कडून मुक्त करण्याचा निर्णय
28. 30 जुलै 1963 प्रवीरचंद्र ची तीस लाख ची संपत्ती कोर्ट ऑफ वार्ड कडून मुक्त
29. 16 नोव्हेंबर 1963 प्रवीरचंद्र द्वारे दीपावली सणा चे वेळी दान करतांनी रिक्षाचालक मोतीलाल यांचा हात कापण्यात आला
30. 19 नोव्हेंबर 1963- मोतीलाल चा हात कापण्याचे आरोपावरून प्रवीरचंद्र यांना अटक. तसेच 500 रुपये च्या जमानत वर सुटका.
31. 22 डिसेंबर 1964 हात कापण्या च्या खटल्यात प्रवीरचंद्र यांचे वर एक हजार रुपये दंड तसेच 18 माह की सक्तकैद ची सजा सुनावली . त्याविरुद्ध प्रवीरचंद्र चंद्र दवारा अपील दाखल करण्यात आले.
32. 1964 महाराजा पिपल वेलफेअर असोसिएशन ची स्थापना
33. 12 जानेवारी 1965 प्रवीरचंद्र द्वारा दिल्ली येथे शांतीवन मध्ये उपोषण तसेच गृहमंत्री श्री नंदा द्वारे आश्वासन दिल्यानंतर त्याच दिवशी उपोषण समाप्त
34. 2 नोव्हेंबर 1965 मध्ये अन्नधान्य तुटवडा मुळे प्रभावित होऊन शेकडो आदिवासींचा महाल मध्ये जमाव
35. 16 नोव्हेंबर 1965 आदिवासी महिला द्वारे एक रुपयात मे चार शेर तांदुळ ची मागणी तसेच सोन्याच्या छडी ची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय वर धरणे प्रदर्शन
36. 12 नोव्हेंबर 1965 प्रवेश चंद्र द्वारा लापता सोन्याच्या छडी च्या मागणीसाठी उपोषण अनशन
37. 16 डिसेंबर 1965 कमिशनर श्री वीरभद्र सिंह यांच्या आश्वासनानंतर उपोषण समाप्त
38. 4 फरवरी 1966 केशर पाल द्वारा लेव्ही वसुली करतांनी उपद्रव निर्माण झाल्याने पोलीस द्वारा आदिवासीवर अश्रुगॅस व लाठीचार्ज
39. 8 फरवरी 1966 लेवी वसुली च्या प्रश्नावर प्रवीरचंद्र द्वारे विजय भवन मध्ये उपोषण प्रारंभ
40. अकरा फरवरी 1966 शासना द्वारे उचित कारवाई चे आश्वासन दिल्यानंतर उपोषण समाप्त
41. 12 मार्च 1966 नारायणपूर प्रदेश मध्ये भूकबळी व अन्नधान्य तुटवडा मुळे उपोषण सुरू
42. 18 मार्च 1966 राजमहल मध्ये पोलीस द्वारा आदिवासी ना मारहाण केल्यानंतर आदिवासींनी तीर कमान द्वारे पोलिसावर हल्ला केला. प्रवीरचंद्र यांच्या मध्यस्ती नंतर अप्रिय घटना टळली.
43. 25 मार्च 1966 आदिवासी कैदींना न्यायालय घेऊन जात असतांना अन्य आदिवासी द्वारे पोलीस दल वर तीर फेकून हल्ला. ज्यामध्ये एक सुभेदार सहित नऊ पोलीस घायाळ. त्यामध्ये एक सरदार अवतार सिंह यांच्या मृत्यू मुळे पोलीस द्वारा राज महाल ला घेराव घालून आदिवासी वर गोळीबार व मध्यरात्रीपर्यंत संघर्ष
44. “25 मार्च 1966 रात्री चे वेळी या गोळीबार मध्ये प्रवीरचंद्र भंजदेव यांचा राजमहल मध्येच मृत्यू”
45. 26 मार्च 1966 प्रवीरचंद्र यांचेवर संध्याकाळी अंत्य संस्कार
46. 11 सप्टेंबर 1996 प्रवीरचंद्र भंजदेव यांची पत्नी महाराणी वेदवती देवी यांचे निवासस्थान परलकोट वाड्यात निधन
(संदर्भ- बस्तर के प्रमुख विद्रोह)
*अनुवाद-डाॅ.दीपक केदार 9860 778227 अमरावती*



