घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५६ वा कला व क्रीडा महोत्सव

मुंबई- चेंबूरमधील घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५६ वा भव्य कला व क्रीडा महोत्सव.. यंदा स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणुन महिनाभर विविध उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.या महोत्सवाचा सांगता समारोह आणि महाराष्ट्र दिन व कामगार दिन शुक्रवार १ मे रोजी सत्यनारायण महापूजेने साजरा केला जाणार आहेबेस्ट समितीचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा भव्य कला व क्रीडा महोत्सव सुरू आहे. आतापर्यंत या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये घाटला चषक क्रिकेट,हॉलीबॉल, फुटबॉल,लगोरी,संगीत खुर्ची,कॅरम,वेशभूषा आणि गीत गायन आदींचा समावेश होता. १ मे रोजी दुपारी ३ वाजता सत्यनारायण महापूजा आणि सायंकाळी ७ वाजता नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी विशेष हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक बबन काटवटे यांच्यासह भूषण पाटील,सुरेश परमार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या महोत्सवाला विविध पक्षाचे राजकीय नेते, कलाकार मंडळी भेट देत असतात.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रोहित पाटील तसेच विनायक पाटील, भालचंद्र पाटील, चारुदत्त ठाकूर,नरेंद्र काळंगे,संदेश म्हात्रे आदी पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत.



