ताज्या घडामोडी

सांगाव येथे ‘श्री फ्लेक्स प्रिंटिंग’ चा शुभारंभ सभापती सम्राटसिंग नाईक व जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्या हस्ते संपन्न

शिराळा प्रतिनिधी

सांगाव येथील तरुण उद्योजक सुहास पाटील व श्रीधर पाटील यांच्या ‘श्री फ्लेक्स प्रिंटिंग’ या नवीन व्यवसायाचा शुभारंभ शिराळा तालुक्याचे सभापती सम्राटसिंग नाईक(भैय्या)व जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक(दादा) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सांगाव आणि परिसरातील नागरिकांना आता दर्जेदार फ्लेक्स प्रिंटिंग सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना सम्राटसिंग नाईक म्हणाले की, “ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पाटील बंधूंनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, यामुळे परिसरातील व्यवसायिकांना मोठी सोय होणार आहे.

यावेळी विश्वास कारखान्याचे माजी संचालक मानसिंग पाटील,बाबा पाटील,माजी सरपंच वसंत पाटील,अमित पाटील,उदय पाटील,विनायक पाटील,विकास जाधव,शुभम पाटील,जयसिंग पाटील,जितेंद्र देशमुख,संग्राम पवार सर, सिद्धेश पाटील,दादा जाधव, दादासो पाटील,तानाजी पाटील आदी मान्यवर तसेच गावातील ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??