ताज्या घडामोडी

शिराळा प्रतिनिधी

संत बाळूमामा हे  एक महान संत असून त्यांना सर्वसामान्य लोक देवाचा अवतार मानत असून संपूर्ण महाराष्ट्रात यांच्याकडे आदराचे स्थान म्हणून ओळखले जाते. असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले.

शिरशी (ता. शिराळा) येथे श्री विठ्ठल बिरदेव व सद्गुरू श्री संत बाळूमामा भंडारा उत्सव पर्व दुसरे सोहळ्यास जि .प .सदस्या सौ. राजेश्वरी नाईक व रणधीर नाईक यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.नाईक पुढे म्हणाले,संत बाळूमामा हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि थोर पुरुष होते. धनगर (कुरुबा) समाजात जन्मलेल्या बाळूमामांना लोक देवाचा अवतार मानतात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दीन-दुबळ्यांची सेवा आणि समाजकल्याणार्थ घालवले असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये गावोगाव बाळूमामामांच्या भक्त गणनामधे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.     यावेळी श्री कृष्णात डोणे महाराज व कृष्णात पडवळे व इतर मान्यवरांच्या हस्ते रणधीर नाईक व जि.प .सदस्या सौ. राजेश्वरी नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तर शिरशी व पंचक्रोशीतील तसेच विविध विभागातून आलेले सर्व बाळूमामांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??