शिराळे खुर्द शाळेचे जिल्हा परिषद गुणवत्ता शोध परीक्षेत सुयश

विहान पाटील गुणवत्ता यादीत जिल्ह्यात १३ वा. तर इयत्ता पहिलीचा १००% निकाल.
शिराळा प्रतिनिधी
सांगली जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी तसेच जिल्हा परिषद गुणवत्ता शोध चाचणी परीक्षेत जिल्हा परिषद शाळा शिराळे खुर्द येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सुयश संपादन करत शाळेचा गौरव वाढविला आहे.
इयत्ता चौथीतील विद्यार्थी विहान मारुती पाटील याने ३०० पैकी तब्बल २६६ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी १००पैकी उत्कृष्ट गुणांची कमाई केलेली आहे. यामध्ये निखिल कदम (८२) विघ्नेश सुतार (७८) आराध्या सुर्ले (७८)श्रीराज पाटील (७६) कौस्तुभ पाटील (७२) प्रितेश पाटील (५८) आणि शिवम पाटील (५४) यांनी सुयश मिळविले.
तसेच इयत्ता दुसरीत १००पैकी वेदांत पाटील (८२)प्रेम शेळके (५८) आयुष पाटील ५४आणि साई काळे (४४) यांनी यश संपादन केले.
इयत्ता तिसरीमध्ये शौर्य दत्तात्रय पाटील (२४०), वैष्णवी भिमराव कदम (२२४), स्वराली संदीप पाटील (२१०), आदित्य श्रीकांत सुतार (१९४), राधा मारुती पाटील (१९४) आणि विघ्नेश दिनकर पोवार (१७०) यांनी उल्लेखनीय गुण मिळविले.
तसेच इयत्ता चौथीमध्ये आराध्या संदीप पाटील हिने ३००पैकी १८२ गुण मिळवत यश मिळविले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रकाश सावंत तसेच सतीश मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख आणि केंद्रप्रमुख रविंद्र लोंढे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



