ताज्या घडामोडी

50 वर्षापुढील प्रवास वाढदिवसाच्या निमित्ताने.‌… विजय रामचंद्र जाधव

*50 वर्षापुढील प्रवास वाढदिवसाच्या निमित्ताने*.‌…
मित्रांनो विजय रामचंद्र जाधव हे नाव खरतर फार मोठे की छोटे यामध्ये न जाता विजय जाधव यांच्या बाबतीत काही विषय समजून घेऊ वाटतात
अगदी सर्वसामान्य दलित घरातील हा मुलगा बोरी खुर्द साळवाडी ता.जुन्नर जि. पुणे गावातुन शहरात येतो म्हणजे मुंबईत येतो आणि एक वेगळीच ओळख निर्माण करतो
तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे असे अनेक जण शहरात येऊन आपले आयुष्य सुखमय करतात खरतर हेच आपल्याला मला सांगायचे आहे *ज्यांनी स्वतः च्या सुखासाठी ही ओळख निर्माण केली नसुन मुलांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबियांना सुख आनंद मिळण्यासाठी ओळख निर्माण केली आहे*
*हरवलेल्या चुकलेल्या फसवणूक करून आणलेल्या रेल्वे स्टेशनवरील मुलांना मदत करून त्यांना त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करणारी राष्ट्रीय संस्था अशी समतोल फाऊंडेशनची ओळख आहे*
वयाच्या तरूणाईत असताना म्हणजे फक्त 19 वय वर्षं असताना हा तरुण सामाजिक कार्यात आला घरातील कोणताही वारसा वगैरे नसताना हे क्षेत्र निवडले त्यावेळी म्हणजे 1995 मध्ये मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर पाकीटमारी करणारे नशा करणारे चोरी, भंगार गोळा करणारे,हमाली करणारे ,उगाचच भटकणारे अनेक मुलांच्या झुंडी होत्या तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते पण पेजर लोकांच्या कमरेला असायचे काही सामाजिक क्षेत्रात आंदोलन करणाऱ्या मोठ्या मोठ्या स्वयंसेवी संस्थाचा संपर्क आला आणि त्यातुनच सामाजिक कार्याचा अनेक अनुभव घेत राहिलो
त्यावेळी रेल्वे स्टेशनवर या मुलांच्या विषयावर काम करणाऱ्या एकही संस्था नव्हत्या एवढी मुले नक्की कुठुन येतात आणि कुठे जातात अशा सहज उत्सुकतेने हा विचार पुढे आला आणि ही मुले पुन्हा कुटुंबात जोडली तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून सुरवातीला एका मुलाच्या घरी सोडण्यासाठी प्रयत्न केला तो एवढा यशस्वी झाला की जीवनातील एक नवीन ट्रॅक तयार झाला त्यानंतर अनेक मुलांच्या बाबतीत हे होत राहिले तेव्हा एक वेगळीच मानसिकता तयार होऊन आपला जन्म कदाचित याच सेवेसाठी झाला असावा असे अंतर आत्मातुन येऊ लागले खुप अडचणी समस्या संघर्ष करावा लागला परंतु तेवढेच आशिर्वाद माय माऊलींच्या डोळ्यातील अश्रू मधुन मिळत होते नाही नाही म्हणता आज 2004 पासून सुरू झालेला हा प्रवास 2025 पर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक मुलांना कुटुंबात पुनर्वसन करून सातत्याने सुरू आहे प्रत्येक मुलाने आपल्या राज्यात जिल्हायात आपल्या भाषेत कुटुंबाशी जोडुन विकास करण्यासाठी पुनर्वसन झाले पाहिजे म्हणजे अनाथ मुले ही ओळख निर्माण होणार नाही कुटुंब व्यवस्था ज्या देशात सर्वात मोठी आहे त्या भारतात अनाथ मुले कशी असणार हा एक मोठा प्रश्न आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे शासन, प्रशासन, सरकार, समाज, कायदे ,विभाग सर्व काही असले तरी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी फार कष्टमय योगदान महत्त्वाचे असते आम्ही तर ईश्वरी शक्ती ला स्मरून जे काही करता आले ते करतोय निसर्गातील एक दैवी शक्ती आपल्या हातातुन हे करून घेतेय यासाठी आपली निवड केली हेच केवढे मोठे भाग्य आहे ज्या सेवा संघटनेला आज 100 वर्षे झाली त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागात सुद्धा आजही स्टेशनवरील मुलांच्या विषयावर काम करताना समतोल फाऊंडेशन सोडून एकही संस्था नाही याचा सुद्धा अभिमान वाटतो कारण मी स्वतः स्वयंसेवक आहे
*खरतर ईश्वरी कार्याला ईश्वरी लोक नेहमीच भेटतात क्षणोक्षणी सोबतीला असतात म्हणून तर RSS मधील जयंतराव सहस्रबुद्धे सारखे, राजकारणातील संजय केळकर साहेब यांच्या सारखे तर माझी पत्नी सहचरणी सौ.गीता जाधव सारखे व्यक्ती मला देवासारखे वाटतात* इतरही अनेक लोक यामध्ये आहेत ते पडद्याआड आहेत ज्यामध्ये सोबतीला असणारे व सोबत दिलेले कार्यकर्ते यांचा समावेश आहे कारण हे चक्र चालू राहण्यासाठी फार वेगवेगळ्या एनर्जी काम करत आहेत तरच ते चक्र फिरणार आहे आणि म्हणूनच आज समतोल फाऊंडेशन चे सामाजिक 12 प्रकल्प सामाजिक बदल होण्यासाठी आपोआपच सुरू आहे इतर संस्था सारखे ते बजेट ,टेंडर ,फंडिंग एजन्सी,सरकारी अनुदान किंवा सी एस आर साठी उभे राहिले नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून उभे राहिले आणि सामाजिक देणगीतूनच सुरू आहेत अनेकांना फार आश्चर्य वाटते एवढेच नव्हे तर काहींना ही कुरघोडी सुद्धा वाटते तर काहींना अभिमानाने समाजातील एक आदर्श संस्था वाटते संपूर्ण भारतात फक्त दोनच संस्था अशा प्रकारे ट्रँफिकिंग संदर्भात तेही मुलांच्या विषयावर आणि पुनर्वसन म्हणून काम करत आहेत ज्यामध्ये समतोल फाऊंडेशन आहे ही आपल्या भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे सध्या शासनाने प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटते कारण एकही संस्था संपूर्ण भारतात रेल्वे स्टेशनवरील मुलांच्या संदर्भात काम करत नाही तशी परवानगी दिली जात नाही याचाच परिणाम म्हणून मुले पळवणारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत महाराष्ट्रात राजकीय नेते सुद्धा याचा संदर्भ देऊ लागले आहेत
काही जरी असले तरी सामाजिक विश्वास हा महत्त्वाचा आहे व असतो याच विश्वासातच समतोलचे कार्य आहे
*1280 पुरस्काराने सन्मानित ही संस्था अनेक अडचणी समस्या संघर्ष यातुनच सुरू आहे* तरीही
“देव तारी त्याला कोण मारी” याप्रमाणे आपला प्रवास सुरू आहे*
आजच्या ५० व्या वर्षात वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक चढ उतार बघितले संयम, चिकाटी आणि सातत्य याचा समतोल ठेवून कार्य सुरू ठेवले आहे समाज आणि शासन दोन्ही ठिकाणी अनुभव घेतला आहे आणि घेतही आहे
*आता 50 वयाच्या पुढील प्रवास माझा आजपासून सुरू झाला आहे 25 डिसेंबर हा दिवसच मुळात एक पवित्र दिवस आहे याच दिवशी भारताचे पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा सुद्धा जन्मदिवस आहे याची सुद्धा आठवण येते* समाजकारण आणि राजकारण ही सामाजिक बदलाची मोठी चाके असतात बालप्रेमी समाज निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावून प्रामाणिकपणे काम करत आहे आतापर्यंत आपल्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नाही यापुढे सुद्धा असेच प्रेम सहकार्य आदर सन्मान सहभाग असेलच शेवटच्या श्वासापर्यंत मुलांच्या विषयावर सेवा, विकास आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहील अशी प्रार्थना ईश्वरचरणी करतों
*स -समता म -ममता तो -तोहफा*
*ल -लक्ष्य ही चसुत्री म्हणजे समतोल फाऊंडेशन होय*
खुप खुप धन्यवाद
*विजय जाधव*
*समतोल फाऊंडेशन संस्थापक*

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??