मुरूम नगरपरिषदेवर भाजपचे बापूराव पाटील यांचा एकहाती सत्ता काबीज करून विजय

पन्नास वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती करत विरोधकांचा सुपडा साफ…
मुरूम, ता. उमरगा, ता. २१ (प्रतिनिधी) : नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया मंगळवार (ता. २) रोजी पार पडली होती. निकाल मात्र लांबणीवर गेला अखेर रविवारी (ता.२१) रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाटील परिवाराची ५० वर्षापासून एकहाती सत्ता राहिली. यंदाही मुरूम नगरपरिषदेवर प्रथमच भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत पाटील परिवाराने एकहाती सत्ता कायम ठेवून ऐतिहासिक वर्चस्व प्रस्थापित केले. ही निवडणूक स्थानिक पातळीवर असल्याने या निवडणुकीत पक्ष नव्हे तर पाटील परिवारावर जनतेचे प्रेम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होऊन मतदारांनी विजयी केले. पारंपारीक विरोधकांने एकहाती सत्तेचा बुरुज हलवीण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले. जनतेने मात्र त्यांच्या विचाराला नाकारून कमळ फुलवत मतदानरुपी लोकशाहीचा गुलाल पाटील परिवाराला लावून लोकशाहीच्या आढून जनतेचा विश्वास घात करणाऱ्या विरोधकांला मतदानातून मतदारांनी चांगलाच धडा शिकविला. माजी मंत्री तथा भाजप लातूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार बापूराव पाटील, भाजप युवानेते शरण पाटील, सौ. संपदा शरण पाटील, स्मिताताई बापूराव पाटील व सर्व उमेदवार यांनी प्रत्येक प्रभागात घेतलेल्या कॉर्नर बैठका, प्रचार पदयात्रा आणि त्यामध्ये मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणजे विजयी संदेश देत होते. फक्त निकडणुकीची औपचारिकता बाकी राहिली होती. अखेर तो दिवस उजाडला २१ डिसेंबरला. ३० नोव्हेंबर रोजी शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक मार्गे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत निघालेल्या पदयात्रेला उसळलेला जनसागर पुन्हा एकहाती सत्तेची साक्षी देत होते. नंतर साठे चौकात माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे सह उपस्थित मान्यवरांच्या पार पडलेल्या विराट सभेत बसवराज पाटील यांनी मुरूमकरांना केलेल्या संभाषणाने विजयावर शिक्कामोर्तब झाला. विरोधकांवर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपण भविष्यात नगरपरिषदेच्या माध्यमातून जो वचननामा निवडणुकीत जनतेसमोर मांडून येणाऱ्या काळात विकासात्मक काम करण्याचा संकल्प अधोरेखित केला. या सभेपासूनच मतदारांना कळले की उच्च विचाराचे राजकारण काय असते. इथूनच मतदारांचे मतपरिवर्तन झाले. पाटील परिवाराच्या माध्यमातून सर्व धार्मियांना मुरूम नगरपरिषदेवर ५० वर्षे कै. माधवराव (काका) पाटील यांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात बसवराज पाटील, बापूराव पाटील यांनी संधी दिली. मात्र या निवडणुकीत पाटील परिवारातील बापूराव पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. यावेळी मतदारांनी उत्स्फूर्तपणे बापूराव पाटलांचा प्रचार करत विजयाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव पाटील यांनी प्रतिस्पर्धी अजित चौधरी यांच्यापेक्षा ४०१९ मताच्या फरकाने विजय मिळविला. या निवडणुकीतील प्रभागनिहाय विजयी उमेदवार खालील प्रमाणे… प्रभाग एक-अ व ब : स्नेहा राम बंडगर (७२८ मतांनी विजयी), अमर धनराज भोसले (५३६ मतांनी विजयी), प्रभाग दोन-अ व ब : सचिन गुलाब फनेपुरे (३११ मतांनी विजयी), श्रीदेवी नागप्पा दुर्गे (३९२ मतांनी विजयी), प्रभाग तीन-अ व ब : महादेवी बबन बनसोडे (३१३ मतांनी विजयी), अहमद युनूज मनियार (२४३ मतांनी विजयी), प्रभाग चार-अ व ब
अंकिता राजकुमार अंबुसे (६७० मतांनी विजयी),
निरजानंद सच्चिदानंद अंबर (६९१ मतांनी विजयी), प्रभाग पाच-अ व ब : गौस रशीद शेख (२१० मतांनी विजयी), निर्मला प्रकाश कंटेकुरे (४७१ मतांनी विजयी), प्रभाग सहा-अ व ब : रूपचंद गुंडेराव गायकवाड (२५२ मतांनी विजयी), मुमताजबी मलंग ढोबळे (२०० मतांनी विजयी), प्रभाग सात-अ व ब : ज्योती सुजित शेळके (३४८ मतांनी विजयी),
रमेश दत्तू चव्हाण (१७२ मतांनी विजयी), प्रभाग आठ-अ व ब : सुनिता मारुती बनणे (५५८ मतांनी विजयी), राजेंद्र संभाजी बेंडकाळे (५१२ मतांनी विजय), प्रभाग नऊ-अ व ब : समीना राजाबकसर मुल्ला (१३५ मतांनी विजयी), अजितकुमार अरविंद चौधरी (९ मतांनी विजयी), प्रभाग दहा-अ व ब : रागिनी भारत गायकवाड (३४६ मतांनी विजयी),
सिद्राय्या सायबण्णा ख्याडे (५२२ मतांनी विजयी). मुरूम शहरातील नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाकरिता सर्वात जास्त मतांनी निरजानंद सच्चिदानंद अंबर ६९१ मतांनी विजयी तर सर्वात कमी मतांनी अजितकुमार अरविंद चौधरी ९ मतांनी विजयी झाले. पाटील परिवारातून एक व्यक्ती शहराच्या सेवेसाठी सक्रिय होतो आहे. यात गैर काय ? असा सवाल मतदारांमध्ये निर्माण झाला होता मात्र मतदारांनी पाटील परिवारावर विश्वास दाखवून आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. मतदारांनी विरोधकांच्या विचाराला नाकारले आणि कमळ फुलविले. पाटील परिवाराने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुरूम नगरपरिषदेवर रचलेले ऐतिहासिक रेकॉर्ड पुन्हा एकदा पाटील परिवारानेच भाजपच्या माध्यमातून एकहाती सत्ता काबीज करून वर्चस्व सिद्ध केले. मुरूम शहरात पक्षाला नव्हे, पाटील परिवाराला पाहून मतदान होते. हे पुन्हा एकदा जनतेने सिद्ध करून जलवा कायम राखला. मतमोजणी प्रसंगी प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज होती.



