माजी आ. बच्चू कडू यांना “साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरस्कार” प्रदान* *तर “सामाजिक पुरस्कार” ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना सन्मानपत्र देऊन केले सन्मानित

अमळनेर-
दुष्काळ पडल्या नंतर कर्ज माफ करू असे म्हणणारे मुख्यमंत्री आज ओला दुष्काळ पडून ही काही बोलायला तयार नाहीत,ज्या शेतकऱ्यांच्या मतावर आमदार खासदार निवडून येतात त्यांच्यावरच सर्वात जास्त अन्याय होत असल्याचे खंत माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली ते अमळनेर शहरातील
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात बोलत होते,यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे,संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ऍड अशोक बाविस्कर, मगन पाटील, भास्कर बोरसे, किरण पाटील, प्रा शेख ,उपस्थित होते
यावेळी माजी आमदार बच्चू कडू यांनी बोलताना सांगितले की,शेतकऱ्यांच्या आंदोलना पेक्षा गावातील गणपती बसवायला जास्त लोक एकत्र येतात, एवढी उदासीनता आज समाजात असल्याचे सांगत, मत चोरीपेक्षा समाज मन च चोरीला गेल्याचे माजी आमदार कडू यांनी नमूद केले,
शेतकऱ्यांची लढाई का मोठी होत नाही कारण गावागावात जात पात धर्म आणि पंथ आणि यांच्या सोबत राजकीय गुलाम आहेत, ते इतके निष्ठावंत आहेत की बाप मेला तरी चालेल पण नेत्याला काही ही बोलायच नाही अशी भूमिका घेणारे निष्ठावंत शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असल्याचे सांगितले
यावेळी संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील, आणि सचिव संदीप घोरपडे यांच्या उपस्थितीत माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते साथी गुलाबाराब पाटील पुरोगामी राजकीय पुरस्कार माजी आमदार बच्चू कडू, याना तर सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना देण्यात आला तर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनीं बोलताना, देशातील राजकीय स्थिती किती विदारक झाली आहे यावर प्रकाश टाकला, देशात आधी मतदार ,सरकार निवडायचं ,आता सरकार, मतदार निवडतय अशी मिश्किल टिपणी केली, राष्ट्रपती भवना कडे एकाने माहिती च्या अधिकारातून माहिती मागवली.उपराष्ट्रपती यांचा राजीनामा आपल्याला कधी प्राप्त झाला? ,तो कधी मंजूर झाला? नवीन उप राष्ट्रपती निवडीचे नोटिफिकेशन कधी काढलं?अशी माहिती मागवली होती, यावर उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला आहे याबाबत आमच्या कार्यालयाकडे कोणतीही माहिती नाही असे लेखी उत्तर राष्ट्रपती भवनातून देण्यात आले आहे ,तेच उपराष्ट्रपती राजीनामा दिल्यापासून गायब आहेत, या स्थितीला आपण पोहोचलो आहोत, याच साठी महापुरुषांनी संघर्ष केला होता का? असा सवाल त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना विचारला. तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी अध्यक्षीय भाषणातून बोलताना सांगितले की,
जातीभेदाच्या नावाखाली तरुणांचे माथे भडकविले जात आहेत,सध्या
राजकीय विदारक परिस्थिती असली तरी धीराने नेटाने काम करा,शेवटी लोकशाही मूल्यांचाच विजय होणार आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला
कार्यक्रमाचे प्रस्ताविकातून, गुलाबराव बापूंचा पुरोगामी विचारांचा वारसा आम्ही चालवत आहोत,त्यांचा हा वैचारिक वारसा आम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतो असे
संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी सांगितले,
यावेळी
साथी संदेश वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकासह रोख रकम आणि प्रमाणपत्रे देऊन माजी आमदार डॉ सुधीर तांबे आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले ,यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले,
साने गुरुजी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली सूत्रसंचालन जे एस पाटील, विलास चौधरी यांनी केले
पुरस्कार वितरण समारंभाला शहरातील दिव्यांग बंधू सुजाण नागरिक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या साने गुरुजी विद्यामंदिर, साने गुरुजी नूतन माध्य.विद्यालय,साने गुरुजी कन्या शाळा आणि साने गुरुजी अंगण वाडी च्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले