भुसणी (ता. उमरगा) येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी प्रेमनाथ आपचे यांची नियुक्ती

मुरूम, ता. उमरगा, ता. २८ (•प्रतिनिधी) : भुसणी (ता. उमरगा) येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी प्रेमनाथ आपचे यांची नियुक्ती करण्यात आली असून गुरुवारी (ता.२८) रोजी या नूतन मुख्याध्यापकाचा पदभार कार्यक्रम पार पडला. नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम संचलित भुसणी (ता. उमरगा) येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रेमनाथ आपचे यांची नियुक्ती झाली आहे. ते १९९९ ला मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले तर २०१७ ला भुसणी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या शाखेत त्यांची बदली झाली असून आता या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी त्यांची नियुक्ती आहे. गुरुवारी (ता.२८) रोजी विद्यालयात या नूतन मुख्याध्यापकाचा पदभार कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकट जाधव, मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे (मुरूम),पर्यवेक्षक राधाकृष्ण कोंढारे, विवेकानंद परसाळगे, राजशेखर कोरे, बी. एस. पाटील, इरफान मुजावर, शिवानंद पाटील, महेंद्र गायकवाड, जमीर मुजावर आदींची उपस्थित होती. या नियुक्तीनंतर माजी मंत्री बसवराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, माधवराव पाटील महावलिद्यालयाचे प्राचार्य अशोक सपाटे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.