ताज्या घडामोडी

समाजशास्त्र पदव्युत्तर विषयात विद्यापीठात प्रथम आलेला नागराज पालापूरे यांचा बापूराव पाटील यांच्या हस्ते सत्कार.

मुरूम, ता. उमरगा, ता. २६ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील समाजशास्त्र पदव्युत्तर विषयात मार्च-एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत गुणाानुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल नगर शिक्षण विकास मंडळाच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते नागराज पालापूरे यांचा मंगळवार (ता. २६) रोजी सांस्कृतिक सभागृहात सत्कार करण्यात आला. या महाविद्यालयाने गुणवत्तेची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जोपासलेली असून पुढेही ही गुणवत्ता कायम राखण्याचा मनोधर्य यावेळी बापूराव पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, संस्थेचे संचालक राजेंद्र भोसगे, डॉ. सतिश शेळके, सुजित शेळके, चंद्रकांत बालकुंदे, गणेश अंबर, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, बेळंंब चे सरपंच महालिंगप्पा बाबशेट्टी, पालक सुभाष पालापूरे, रोहित पालापूरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सतिश शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात बापूराव पाटील यांच्या हस्ते नागराज पालापूरे यांचा सत्कार करताना धनराज मंगरुळे, राजेंद्र भोजगे, सतिश शेळके, अशोक सपाटे व अन्य.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??