जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्था,(महाराष्ट्र),नॕब हाॕस्पिटल मिरज,ग्रामपंचायत वाटेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटेगाव” यांचे संयुक्त विद्यमाने.. वाटेगाव येथे मोफत नेत्रचिकित्सा व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

शिराळा प्रतिनिधी
वृक्षरोपाला पाणी देऊन मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करणेत आले.वैद्यकीय अधिकारी डॉ.वृषाली देवापूरे मॕडम यांनी स्वागत केले,कोकरूड ग्रामीण रुग्णालयच्या नेत्रचिकित्सा अधिकारी सौ.सविता नलावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक व नेत्रदान, अवयवदान या विषयावर मार्गदर्शन केले,जागृत ग्राहकराजा महाराष्ट्र संघटनेचे राज्य सहसचिव श्री.अनंत खोचरे यांनी बाजारपेठेत ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी खरेदी वेळी खबरदारी घेणे व ग्राहक सुरक्षैसाठी ग्राहक संघटनेचे महत्त्व व गरज या विषयावर उपस्थित लोकांशी संवाद साधला,ग्राहकराजा संघटनेच्या सांगली जिल्हा महिला उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत वाटेगाव च्या विद्यमान उपसरपंच सौ.सोनालीताई पाटील व ग्राहकराजा पदाधिकारी सौ.सारीका पाटील(वाटेगाव),राज्य सहसचिव श्री.अनंत खोचरे,ग्रा.पं.वाटेगाव सदस्या देसाई मॕडम,मान्यवर ग्रामस्थ यांचे शुभहस्ते आशा भगिनी व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी बंधूभगिनी यांना उत्तम कार्याबद्दल जागृत ग्राहकराजा संस्थेच्या वतीने “गुणवंत कर्मचारी प्रशस्तिपत्र”देऊन सन्मानित करणेत आले.
वैद्यकीय अधि. डाॕ.देवापूरे मॕडम यांनी तंबाखू मुक्ती, क्षयरोग उपचार व निर्मूलन या साठी बहुमोल मार्गदर्शन केले,वैद्यकीय अधिकारी डाॕ.ऐश्वर्या मोरे व प्रा.आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी बंधूभगिनी,वाटेगावच्या आशा स्वयंसेविका यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.या शिबिरात ७५ नेत्र रुग्णांची मोफत नेत्रचिकित्सा करून मोतीबिंदू असणाऱ्या १० रुग्णांना त्याच दिवशी मोफत शस्त्रक्रिया करणेसाठी नॕब हाॕस्पिटल मिरज येथे नेऊन यशस्वी शस्त्रक्रिया करणेत आल्या.