भगवान चक्रधर स्वामी हे मानव कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे महान संत-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड – आपल्या भारत देशाला, जगाला लोकसेवेसाठी संतांची खूप मोठी परंपरा असून अकराव्या शतकामध्ये, बाराव्या शतकाच्या पुर्वार्धात या देशाच्या-जगाच्या मानव कल्याणासाठी भगवान सर्वज्ञ संत श्री चक्रधर स्वामी हे सर्वस्वाचा त्याग करणारे महान संत होत, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.25 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता महानुभाव पंथांचे संस्थापक, थोर संत, महान तत्वज्ञ, एक दीपस्तंभ, लीळा चरित्र ग्रंथाचे मुळ लेखक भगवान सर्वज्ञ संत श्री चक्रधर स्वामी यांची 883 वी जयंती (अवतार दिन) म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती अभिवादन सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
सर्वप्रथम एसटी महामंडळाचे विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांच्या हस्ते श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, भगवान सर्वज्ञ श्री संत चक्रधर स्वामी यांनी ज्ञान आणि भक्ती यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून लोक जनसेवा केली. त्यांनी अंधश्रद्धेवरही प्रहार करून सामाजिक प्रबोधन केले. ते एक दीपस्तंभ होते. अशा या महान संतांचे कार्य आणि विचार तुम्ही-आम्ही सर्वच जण आत्मसात करून समाजाप्रती-देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांनी यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय वाहतुक अधिक्षक मिलींदकुमार सोनाळे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णू हारकळ, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, चार्जमन योगेश जगताप, कैवल्य बासवाडेकर, पाळीप्रमुख मनोहर माळगे, विनायक चव्हाण, वाहतुक नियंत्रक सौ.पायल बैस, वाहन परिक्षक शंकर ढगे, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, सौ.वैशाली कोकणे, सुनिता हुंबे, संगीता वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रापम आगारातील कष्टकरी, कामगार-कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.