एक आवाज ,हजारो मने जिंकणारा : निवेदक महेश मुंडे

आपल्या प्रभावी आणि भारदार आवाजाने परळीतील व्यासपीठांना एक वेगळी ओळख देणारे, जिरेवाडीच्या मातीतून उमललेले प्रभावी व्यक्तिमत्त्व, निवेदक महेश मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आपला हा प्रेरणादायी प्रवास असाच यशस्वी राहो आणि आपल्या आवाजाची जादू अशीच कायम राहो, हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!एक आवाज, हजारो मने जिंकणारा: निवेदक महेश मुंडे यांचा यशस्वी प्रवास.परळी, बीड: जिरेवाडीच्या मातीतून आलेले महेश मुंडे, आज आपल्या प्रभावी आणि भारदार आवाजामुळे परळी तालुक्यात एक प्रतिष्ठित नाव बनले आहेत. त्यांची यशोगाथा केवळ एका निवेदकाची नसून, ती जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाची साक्ष आहे. स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. विलासराव देशमुख आणि स्व. प्रमोद महाजन यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या भाषणांचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी आपल्या संवाद कौशल्याला एक मजबूत पाया दिला.रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथे शिक्षण घेत असताना महेश यांना अनेक कार्यक्रमांमध्ये बोलण्याची संधी मिळाली. तेथील प्राध्यापक श्री. माने-देशमुख यांच्या निवेदन शैलीने त्यांच्यावर अशी खोलवर छाप पाडली, की त्यांच्यातील कला अधिकच फुलून आली. पुढे पुणे येथील कॅलिड्स मिडिया अकॅडमीमधून त्यांनी मिडिया कोर्स पूर्ण केला, ज्यामुळे त्यांच्या अंगभूत प्रतिभेला एक परिपक्व रूप मिळाले.
महेश यांच्या सार्वजनिक जीवनाची खरी सुरुवात पाच वर्षांपूर्वी त्यांच्याच गावी, जिरेवाडी येथे झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आ.श्री. धनंजय मुंडे यांच्या सभेच्या संचलनाची पहिली संधी त्यांना मिळाली. ही संधी त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरली. त्यानंतर श्री. बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांनी त्यांना एका पक्षाच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली आणि तिथून त्यांच्या निवेदनाच्या यशस्वी वाटचालीस खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
आ.श्री. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळी शहर आणि ग्रामीण भागांमध्ये झालेल्या असंख्य कार्यक्रमांमध्ये महेश मुंडे यांनी कुशलतेने संचलन केले आहे. यामुळे त्यांचे नाव सर्वांच्या ओळखीचे झाले आणि ते परळीकरां साठी एक परिचित चेहरा बनले. आ.श्री. धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच परळीत आले असता, त्यांच्या भव्य स्वागत आणि सत्कार सोहळ्याचे संचलन करण्याचा बहुमान महेश यांना मिळाला. तसेच, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित ‘शासन आपल्या दारी’ हा भव्य कार्यक्रम परळी-वैजनाथ येथे संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होऊन यशस्वी संचलन करण्याचा योगही महेश यांना मिळाला.
याव्यतिरिक्त, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचाराच्या सांगता सभे पासून ते आ.श्री. धनंजय मुंडे यांच्या प्रचाराच्या सांगता सभे सह, महेश यांनी प्रत्येक मोठ्या व्यासपीठावर आपल्या दमदार आवाजाची छाप पाडली.
समाजातील विविध क्षेत्रांतून मिळालेला मान
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रां व्यतिरिक्त, प्रशासकीय कार्यक्रमां मध्येही त्यांच्या कामाचा ठसा उमटला आहे. ‘भारताचे ॲल्युमिनियम मॅन’ भरतजी गीते यांच्या सत्कार सोहळ्यातील मुलाखतीचे प्रभावी संचलन असो, किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे निवेदन असो, महेश यांनी प्रत्येक कार्यक्रमाला एक खास ओळख दिली. परळीचे भूमिपुत्र आणि आयएएस अधिकारी श्री. किरणकुमार गित्ते साहेब, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते यांचे प्रभावी संवाद कौशल्य आणि बोलण्याचा नेमकेपणा याबाबतचे मार्गदर्शन महेश यांच्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरले. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या विविध कार्यक्रमात संचलन करण्याचा त्यांना योग आला आणि यातूनच ते या क्षेत्रात अधिक प्रभावी बनले.
आजही, परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या वार्षिक वर्धापनदिन सोहळ्या सारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये त्यांच्या आवाजाची जादू अनुभवता येते. महेश मुंडे यांचा आवाज केवळ भारदार नाही, तो कार्यक्रमात एक वेगळी ऊर्जा निर्माण करतो, जो श्रोत्यांना खिळवून ठेवतो. ग्रामीण भागातून सुरू झालेला हा प्रवास आज त्यांच्या प्रभावी आवाजाने हजारो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. हे यश केवळ त्यांच्या अंगभूत प्रतिभेचे नाही, तर त्यांच्या निष्ठेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे.