ताज्या घडामोडी

ग्रामीणअर्थकारणाचा कणा असलेल्या सेवा सोसायटी च्या माध्यमातून सभासदांना, शेतकऱ्यांनाआर्थिक स्थैर्य मिळावे.- जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक.

शिराळा प्रतिनिधी

चिखली विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड चिखली ता. शिराळा या संस्थेचा डिव्हिडंट जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांच्या हस्ते वितरण करण्यात आला त्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते

नाईक पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन
संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था आहेत. ग्रामीण विभागाच्या विकासामध्ये सेवा सहकारी संस्थांचा फार मोठा वाटा असल्यामुळे या संस्था मोठ्या झाल्या पाहिजेत.परंतु आपल्या पुढे शासनाकडून वारोवार कर्जमाफीच्या संदर्भात आश्वासने,घोषणा दिल्या मुळे शेतकऱ्यांचा सर्वांचा हा समज झालेला आहे की कर्जमाफी होईल आणि त्यामुळे अनेकांनी परिस्थिती असताना सुद्धा कर्ज भरण्यासाठी टाळाटाळ केली आहे. माफ होणारच आहे आपण आता भरून आणखीन पुन्हा आपले पैसे कशाला वाया घालवायचे अस्या समजूत्ती मुळे व कर्जमाफीच्या घोषणामुळे अनेक संस्थाना आज अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतु संस्था चालकांनी चुकीच्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून नवनवीन गोष्टी अमलात आणून संस्थाची प्रगती साधली पाहिजे. सध्या आपल्याला शेतक-यासाठी औषध फवारण्यासाठी ड्रोनच्या सुद्धा संकल्पना पुढे आल्या आहेत. त्यासाठी शासन अनुदान देत आहे.अस्या पद्धतीचे काही पर्याय आपल्याला करता येतील का ते पहाणे गरजेचे आहे.

यावेळी चेअरमन शहाजीराव नाईक,ऍड. संजय नाईक, माधवराव नाईक, पी. जी. पवार,बाबुराव पाटील,रामचंद्र सांळूखे, बाबासो साळुंखे, कृष्णात बिजम, जगन्नाथ पाटील, भानदास पाटील, नामदेव पवार, सदाशिव गवळी,सचिव मनोज पाटील, दिलीप गायकवाड,तुकाराम यादव, ज्ञानदेव गायकवाड, आप्पासो चौगले,पांडुरंग गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??