शेतीच्या मालाला रास्त भाव व त्याला कायदेशीर संरक्षण देणे काळाची गरज आहे.त्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे.असे स्पष्ट प्रतिपादन डॉक्टर अशोकराव ढगे

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये बाळासाहेब सरोदे राहणार वडूले या शेतकऱ्याने काल आत्महत्या केली ही अत्यंत ताजी व दुःखदायक तसेच मनाला देणारी आणि महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना घडली आहे हा प्रश्न शेतकऱ्याची आत्महत्या अतिशय गांभीर्याने घेणे ही महाराष्ट्र शासनाबरोबर समाजाची आणि भारत सरकारची तसेच शेतकरी संघटना व कृषी शास्त्रज्ञांची जबाबदारी आहे तथापि ही जबाबदारी स्वीकारली जात नसल्यामुळे आज दररोज आठ ते नऊ शेतकरी आत्महत्या करतात ही कृषीप्रधान देशाला लाज वाटणारी घटना आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात; मी तसेच आदरणीय खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब आणि नामवंत कायदे तज्ञ हायकोर्ट एडवोकेट अजितराव काळे यांनी राहुल कृषी विद्यापीठामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोग पाशा पटेल व भारत सरकारचे कृषी मूल्य आयोग डॉक्टर पॉल यांची भेट घेतली व त्यांना शेतकऱ्या च्या आत्महत्या बाबत चर्चा करण्याची विनंती केली त्या दोघांनीही अतिशय असंवेदनशील भावना व उदासीनता दाखवून प्रश्नाला बगल दिली दुर्दैवाने माननीय कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य नामदार पाशा पटेल यांनी तर या विषयावर भाष्य करणे टाळून चिल्ली उडवली. एकंदरीत भारत सरकार व महाराष्ट्र शासन तसेच कृषिमंत्री व कृषी मूल्य आयोग शेतकरी संघटना आणि कृषी शास्त्रज्ञ व एकूणच समाज या प्रश्नावर जोपर्यंत उत्तर शोधत नाही तोपर्यंत हा कलंक पुसला जाणे अवघड आहे यातील मूलभूत प्रश्न म्हणजे शेतीच्या मालाला रास्त भाव व त्याला कायदेशीर संरक्षण देणे काळाची गरज आहे.त्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे.असे स्पष्ट प्रतिपादन डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे