ताज्या घडामोडी

गणेशोत्सवासाठी मूर्तिकार योगेश पवार यांचा गणपती कारखाना सज्ज

मराठवाड्यासह विदर्भ,खांदेशात गणरायाच्या मुर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी

गणेशोत्सव जवळ येत असल्याने सर्वच भाविक भक्तांनी तसेच गणेश भक्तांनी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू केलेली पहावयास मिळत आहे प्रत्येक गणेश मंडळाचा वेगवेगळ्या गणपतीची सुसज्ज व आकर्षक मुर्ती खरेदी करण्याकडे कल असतो.
सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील ज्ञानविकास शाळेसमोर श्रीगणेश कारखाना असुन त्या कारखान्यात सहा कारागीर व पवार कुटुंबातील सदस्य मार्च महिन्यांपासून श्री गणराच्या मुर्त्या तयार करत आहे त्यांनी सात इंच ते सात फुटांपर्यंत विविध प्रकारच्या मुर्त्या तयार केलेल्या आहेत त्यामध्ये दगडुशेठ हलवाई, लालबागचा राजा, चिंतामणी,सिंहासन,गरुड आसन अशा सर्वच प्रकारच्या मुर्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
पिओपी बंदी च्या निर्णयामुळे मुर्त्यांचा तुटवाडा जाणवत असुन मुर्ती तयार करण्याचा खर्चात झालेली वाढ यामुळे गणरायाच्या मुर्त्यांचे दर या वर्षी 30 टक्केनी वाढले असल्याचे मुर्तीकार योगेश पवार यांनी सांगितले
सात इंच ते सात फुटापर्यंत आकर्षक मुर्त्या उपलब्ध असुन सदरील मुर्त्याना मराठवाडा, विदर्भ,खान्देश या भागात मागणी जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुर्त्या विक्री केल्या जात आहेत.
या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असुन भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गणेश मंडळाची स्थापना केलेली असल्यामुळे अनेक मंडळाकडु मागील पंधरा दिवसांपासून मुर्तींचे बुकींग करण्यात येत असून भाविकांचा वाढता उत्साह असल्यामुळे गणरायाच्या मुर्त्यांचा तुटवाडा पडण्याची शक्यता असल्याचे मुर्तीकार योगेश पवार यांनी सांगितले.
सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील
ज्ञानविकास शाळेसमोर पवार आर्टस येथे श्रीगणेश मंडळासाठी मुबलक दरात मुर्त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??