पालघर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे नवे कार्यकारिणी जाहीर

पालघर जिल्हा प्रतिनिधी दि. १८
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाशी संलग्न पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पालघर तालुका शाखेची नवी कार्यकारिणी सोमवारी (दि. १८) बोईसर येथील टिमा सभागृहात महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी जाहीर केली.नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी राजेंद्र पाटील सांबरे, कार्याध्यक्षपदी किरण थोरात, उपाध्यक्षपदी समीर पिंपळे व रमाकांत घरत, सचिवपदी संदेश सातवी तर खजिनदारपदी पराग पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच प्रियंका पाटील, मिथुन तुंबडा, अर्चना पाटील, धनश्री कांबळे, नीलम सिंग, मनोज पाटील व जुनेद खान यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॅरेल डिमेलो, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव आशिष पाटील, तालुका क्रीडा केंद्रप्रमुख प्रकाश पळसुळे, क्रीडा अधिकारी अमृत घाडगे, जयवंती देशमुख तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन अध्यक्ष राजेंद्र पाटील सांबरे यांनी “शासनमान्य सर्व क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी तालुका संघ पूर्ण सहकार्य करेल,” असे आश्वासन दिले. तर कार्याध्यक्ष किरण थोरात यांनी “तालुका क्रीडा संघ केवळ कागदावर न राहता मैदानात उतरून प्रत्यक्ष कामगिरी करेल,” असा निर्धार व्यक्त केला.