ताज्या घडामोडी

राष्ट्रीय सण व महापुर्षांचे जंयती-पुण्यत्तिथी दिनी रक्तदानासाठी आवर्जून पुढे यावे !!-सत्यशोधक ढोक

सुशिलाबेन मोतीलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबीर संपन्न

पुणे -सुशिलाबेन मोतीलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट व भारत विकास परिषद, स्वारगेट शाखा, पुणे यांच्या संयुक्तपणे विद्यमाने सालाबादप्रमाणे दि.15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचे 78 व्या स्वातंत्र्यदिनी जनकल्याण रक्तपेढी पुणे येथे सकाळी 10 ते दु. 2 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत विकास परिषद चे जेष्ठ समाजसेवक प्रवीण दोशी , वासुदेव केंच, पुणे अध्यक्षा सुषमा कोंडे , ट्रस्ट चे अध्यक्ष मोतीलाल शहा, जनकल्याण रक्तपेढी चे डॉ .अतुल कुलकर्णी , सुविधा नाईक ,शेलेश शहा, फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भारत देशावर प्रेम करणारे, एकूण 34 रक्तदात्यांनी श्रेष्ठ दान म्हणून रक्तदान केले .रक्तदानाची सुरुवात संस्था पदाधकारी सुनील मोतीलाल शहा आणि सुषमा कोंडे यांनी व इतर कार्यकर्त्यांनी सुरुवात केली .यावेळी त्यांना डॉ.अतुल कुलकर्णी व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की रक्तदात्यांनी वर्षभरात नियमाने रक्तदान करताना भारताचे राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट ,26 जानेवारी व महापुर्षांचे जंयती-पुण्यत्तिथी तसेच आपल्या कुटुबातील स्वतः सहित मान्यवरांचे वाढदिवस ,विवाह प्रीत्यर्थ आवर्जून रक्तदान करावे. त्यामुळे स्वता:मध्ये एक उर्जा, नवचैतन्य निर्माण होऊ शकते. सोबत आपणास आत्मिक समाधान मिळते असे देखील म्हंटले.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनोज व सुनील मोतीलाल शहा तसेच सुषमा कोंडे यांनी मोलाची मदत केली.तर जनकल्याण रक्तपेढीचे सर्व स्टाफ ,डॉक्टर यांनी मौलिक सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??