भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात साजरे..

मुरूम, ता. उमरगा, ता. १७ ( प्रतिनिधी) : येथील डॉ. झाकीर हुसैन उर्दू हायस्कूल मध्ये भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष रशीद शेख, संस्थेचे सचिव सलीम जमादार, संचालक मेहमूदमियां बागवान, माशकसाब जमादार आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या
मुख्याध्यापिका सय्यदा खतीब बेगम होत्या. प्रारंभी संचालक बंदगीसाब कोतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या दिनाच्या औचित्य साधून दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहशिक्षक रिज़वान बागवान यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून देशभक्तीची ऊर्जा जागवणारा दिवस असल्याचे सांगितले. आपल्या शूर वीरांनी दिलेल्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. लाखो क्रांतीवीरांच्या संघर्षाने व त्यागाने मिळालेल्या या स्वातंत्र्याची जपणूक करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे. ७९ वर्षांपूर्वी तिरंगा फडकवताना जी भावना होती, तीच प्रेरणा आज नवभारत घडवण्यासाठी आपल्याला उर्जित करते असे ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नूर यांनी केले. सूत्रसंचालन जुबेर अत्तार तर आभार इम्तियाज जमादार यांनी मानले. यावेळी पालक, नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.