माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

खंडाळा, दि. १५ ऑगस्ट २०२५
वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद-खंडाळा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे माजी उपाध्यक्ष श्री. संदीपशेठ पारकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत व झेंडा गौरव गीताचे गायन करण्यात आले. प्रशालेतील क्रीडा शिक्षक डॉ. राजेश जाधव व क्रीडा शिक्षिका श्रीमती पल्लवी बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कवायत व संचलन केले.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सलग तीन दिवस ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
बुधवार, दि. १३ ऑगस्ट रोजी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. आनंद पाटील यांच्या हस्ते,गुरुवार, दि. १४ ऑगस्ट रोजी इयत्ता नववीतील NMMS शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी कुमारी स्वरा बारस्कर हिच्या हस्ते,शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे माजी उपाध्यक्ष श्री.संदीपशेठ पारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे, उपाध्यक्ष श्री. रामनाथ आडाव, कोषाध्यक्ष श्री. दिवाकर जोशी, संचालक श्री. संदीप सुर्वे, श्री संदिप विचारे,माजी संचालक,शाळा परिसरातील नामवंत डॉक्टर, सरपंच, माजी मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी जगताप, पर्यवेक्षक श्री.आनंद पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.