भडकंबे गावाचा सर्वांगिण विकास करु – राहुल महाडीक

गावातील विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी आमचा प्रयत्न राहील गावातील सर्व विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी सांगितले.ते भडकंबे (ता. वाळवा) येथील जनसुविधा व नागरी सुविधा विकास योजने अंतर्गत २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. युवा नेते रविंद्र पाटील , नवजीवन दूध संस्थेचे अध्यक्ष मारुती पाटील , भैरवनाथ सोसायटीचे माजी अध्यक्ष बाबुराव पाटील , उपसरपंच संदीप मोरे , सदस्य नितिन बागणे , शुभम माळी , पंडीत लोंढे, सर्वोदय कारखाना संचालक मुकुंद जगताप , परशुराम बामणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आनंदराव पाटील, तानाजी जगताप, अमोल पाटील,दत्तात्रय माळी, सुभाष पाटील,हिंदुराव पाटील,पोपट मोरे,योगेश सुतार मा.ग्रा.सदस्य,गणेश मोरे,अशोक पाटील, प्रभाकर पाटील,कृष्णात बागणे, भगवान बनसोडे,विश्वास बनसोडे, भारत लोंढे,संदीप लोंढे, दिपक बनसोडे, सुशांत बनसोडे, सज्जन पाटील, किसन पाटील,प्रविण भडकंबेकर,नितिन बावचकर, विशाल लोंढे यांच्यासह भडकंबे गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.