शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीचा निकाल त्वरित लावावा

IBPS मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी TAIT 2025 27 मे ते 30 मे आणी 2 जून ते 6 जून 2025 यादरम्यान घेण्यात आली. 2 लाख 19 हजार 308 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली मात्र परीक्षा होऊन 2 महिने उलटून देखील निकाल लावलेला नाही.
राज्यात 2017,2022,2025 मध्ये TAIT च्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. आधीच या परीक्षांमध्ये मोठा कालावधी ठेवण्यात आलेला तसेच निकाल लावण्यास विलंब व नंतर मुलाखतीचा राऊंड व जॉइनिंग यास मोठा अवधी लागत आहे.
परिणामी लाखो भावी शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या विषयात मान. आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी लक्ष घालावे व त्वरित निकाल लावणेस शासनास पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदवीधर संघटनेमार्फत देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष अभिजीत शिंदे सर आणि अरुण पाटील सर उपस्थित होते.