कांदिवली पश्चिम येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित अभिवादन

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
कांदिवली पश्चिम येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन चा कार्यक्रम संपन्न झाला.शुक्रवार दिनांक १५ आगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६वाजता कांदिवली पश्चिम येथील गणेश चौक,शुभम सभागृहात मुंबई मधील धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३० व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, दत्ता यमगर यांनी मुंबई विभागातील धनगर समाज बांधवांशी संपर्क करुन एकत्रित केले, कार्यक्रमाच्या सुरवातीला दिप प्रज्वलीत करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला,या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील घटना कथन केल्या.यळकोट यळकोट जय मल्हार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो,अशा घोषणा देण्यात आल्या.या प्रसंगी धनगर समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.विविध पक्षातील, विविध संघटनातील, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.या मध्ये गणेश हाके, महावीर बनकर, डॉ.नितीराज माने, दत्ता यमगर, पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके शशिकांत झोरे, आनंद मलगुंडे, अंकुश मासाळ, निलेश मोटे, सुभाष डुबे, शंकर बुरुंगळे, माणिक शिंपले, संदीप बिरे, फकिरा राहटळ, पांडुरंग धायगुडे, जालिंदर सरोदे, अशोक बनकर, ज्ञानेश्वर मिंड,गोरख रांधवण,प्रकाश कारंडे,हरिश बुरुंगे, सर्जेराव वैद्य, वाघमोडे मॅडम, आप्पासाहेब कुचेकर, मल्हारी लाळगे, सदाशिव लाळगे, कोळपे सर,व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शेळके यांनी केले.