ताज्या घडामोडी

महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र संत तुकाराम नगर येथे प्रथमच शहरातील गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र संत तुकाराम नगर येथे प्रथमच शहरातील गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण .
महाराष्ट्र कामगार कल्याण,मंडळ संत तुकारामनगर येथे  उपस्थित नागरिकांना  पर्यावरणाची व प्लॅस्टिक न वापरण्याची शपथ आण्णा जोगदंड यांनी देऊन समाज प्रबोधन करून 79 वा स्वतंत्र दिन साजरा केला.
यावेळी शहरात प्रथमच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्या संगीता जोगदंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संगीता जोगदंड म्हणाल्या की मला ज्या मंडळाने गुणवंत कामगार पुरस्कार दिला त्याच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संत तुकारामनगर केंद्रात मला ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला हे माझे नशीबच आहे , कामगार कल्याण मंडळ जात, धर्म, पंथ असा भेदभाव न करता कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. आणि सर्वांनी कामगार कल्याण योजनांचा कामगारांनी त्याचा फायदा करून घेण्याचे आवाहन गुणवंत कामगार संगिता जोगदंड यांनी केले.त्याच्या हस्ते शिशुविहारातील मुलांना खाऊ वाटप केला.

शिवाजीराव शिर्के ज्येष्ठ पत्रकार म्हणाले की आज-काल तुरूणाई ही मोबाईलच्या विळख्यात सापडली आहे. वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे .शासनाने दिलेल्या सुट्टीचा उपयोग तरुण पिढी ही मौजमजा व भटकंती करण्यासाठी करतात हे आपल्या सर्वाचे दुर्दैव आहे. ज्या शूरवीरांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना स्मरण करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही अशी खंत  शिर्के यांनी व्यक्त केली.
गुणवंत कामगार आण्णा जोगदंड यांनी सांगितले की,देश स्वतंत्र झाला हा सहज स्वतंत्र न होता भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांच्या सारखे लढवय्ये यांनी प्राणाची अवती दिली आणि देशासाठी रक्त सांडले आम्हाला त्यांचा आभिमान आहे.आम्ही नुकतेच तळेगाव ढमढेरे येथे क्रांती दिनानिमित्त विष्णू गणेश पिंगळे क्रांतिकारकाच्या जन्मस्थळी जाऊन क्रांतीकवी संमेलन घेतले.

कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक आनिल कारळे सुत्रसंचालन केले व  कामगार कल्याण मंडळाच्या प्रशिक्षण योजना, शिष्यवृत्ती योजना,अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.
भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाची अवती देणाऱ्या शहीद जवानांना प्रथम श्रद्धांजली वाहिली,भारत माता की जय ,वंदे मातरम ,इंकलाब जिंदाबाद, विरोंकी कुर्बानी ,राष्ट्र की कहानी, अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
देशभक्तीपर रचना कवी शामराव सरकाळे यांनी म्हटली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के ,प्रमुख पाहुण्या संगीता जोगदंड,केंद्र संचालक अनिल कारळे, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड,सुदाम शिंदे सदस्य,रयत शिक्षण संस्था,पश्चिम विभाग सल्लागार समिती, साहित्य संवर्धन समितीचे व दिलासा संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे,गुणवंत कामगार काळुराम लांडगे, कार्यालयीन कर्मचारी शरद सुपे,सुरेखा मोरे ,ह.भ.प शामराव गायकवाड ,यादव तळोले महाराज,,संगीता क्षीरसागर ,शैला आवाडे,प्रतिभा मरळ,कवी शामराव सरकाळे , सामाजिक कार्यकर्ते किरण कोळेकर,पांडुरंग सुतार ,सा.का.तेजस कांबळे,अंकुश जाधव ,विकास कोरे ,शिवराम गवस ,इत्यादी गुणवंत कामगार उपस्थित होते

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??