ताज्या घडामोडी

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन खूप जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डी. डब्ल्यू.पी.एस.वंडरलँडच्या प्राचार्या कु. स्वप्नाली टाले मॅडम यांची उपस्थिती लाभली होती.ध्वजारोहणानंतर भारतीय तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी शाळेतील विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने परेडचे सादरीकरण केले.यावेळी त्यांची शिस्त व नेतृत्व कौशल्य वाखाणण्याजोगे होते. शाळेतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर समूहगीतांचे, समूहनृत्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांची शौर्यगाथा सांगितली व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी यासाठी मार्गदर्शन केले.

त्यानंतर शाळेतील विद्यार्थी चि. अरिहंत कळस्कर, आदित्य डिकले,कु.कुंजल शिंदे व संस्कृती राठोड यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल अमूल्य माहिती दिली. तसेच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या विविध व्यक्तिमत्वांच्या वेशभूषा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अनुष्का बनसोडे, प्रणाली गव्हाणे, आकांक्षा गुट्टे व चि.अमरनाथ कराड या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.आनंद काटपुरे सर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नसीर अहमद सर व सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम ,शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब (सचिव, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम,आरोग्य, पर्यटन, उद्योग विभाग त्रिपुरा सरकार) व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??