ताज्या घडामोडी

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यावर आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिराळा प्रतिनिधी

कारखान्याचे संचालक व विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रारंभी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सर्व संचालक व मान्यवरांचे स्वागत केले. देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले. यावेळी संचालक विराज नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संचालक सर्वश्री विजयराव नलवडे, विष्णू पाटील, सुरेश पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव अमरे, संभाजी पाटील, बाबासो पाटील, सुहास घोडे-पाटील, संदीप तडाखे, तुकाराम पाटील, दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील, कोंडीबा चौगुले यांच्यासह सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. पी. आर. माळी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव सचिन पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??