ताज्या घडामोडी

स्वातंत्र्यदिनी माकुणसार येथे तरुणांची ‘माकुणसार कमांडो’ सेवा सुरू

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.१५

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने माकुणसार गावातील तरुणांनी परिसरातील अत्यावश्यक गरजूंसाठी मदतकार्य करण्याच्या उद्देशाने “ माकुणसार कमांडो “ ची स्थापना केली. या टीमचा शुभारंभ लायन्स क्लब ऑफ सफाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (१५ ऑगस्ट) माकुणसार येथे करण्यात आला.

प्राणीमित्र राकेश पाटील यांची ‘कमांडो’ च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून गावातील वीस तरुण या फोर्समध्ये सहभागी झाले आहेत. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा लायन्स क्लब ऑफ सफाळेचे अध्यक्ष लायन मनोज म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला.

कार्यक्रमास लायन्स इंटरनॅशनलचे झोन चेअरपर्सन लायन प्रमोद पाटील, सफाळे क्लबचे सेक्रेटरी लायन जतिन कदम, उपाध्यक्ष लायन सचिन म्हात्रे, खजिनदार लायन कुंदन राऊत, माकुणसार ग्रामपंचायतीच्या सरपंच पल्लवी पाटील, उपसरपंच संकेत पाटील, तसेच लायन्स क्लब ऑफ सफाळेचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

झोन चेअरपर्सन लायन प्रमोद पाटील यांनी तरुणांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगितले. “कमांडोटीमने आपला ड्रेस कोड तयार करून केवळ आपल्या भागापुरतेच नाही तर तालुक्यात कुठेही मदतीची आवश्यकता असेल, तेथे मदतीचा हात पुढे करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ सफाळेचे अध्यक्ष लायन मनोज म्हात्रे यांनी “तरुणांनी सुरू केलेल्या या कमांडो फोर्सला आवश्यक साहित्याची पूर्तता लायन्स क्लब करेल,” असे सांगत शुभेच्छा दिल्या.

सरपंच पल्लवी पाटील यांनी लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, “मोकाट गुरांना बेल्ट बांधल्याने अपघातांचे प्रमाण कमी होईल,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

माकुणसार येथे सुरू झालेल्या कमांडो
टिमची सेवा आग विझवणे, पूरस्थितीत मदत करणे, रात्री गस्त घालणे, वादळात पडलेली झाडे हटवणे, साप पकडून सोडणे, विहिरीत अडकलेल्या प्राण्यांची सुटका करणे, गणेश विसर्जनातील मदत अशा विविध क्षेत्रांत मिळणार आहे.

टिममध्ये सर्पमित्र, पक्षीमित्र, प्राणिमित्र, गिरीरोक, पोहणारे, फोर-व्हिलर चालक, जलद आग विझवणारे, वेटलिफ्टर, इलेक्ट्रीशियन, लोकेशन ट्रॅकर्स, झाडावर चपळाईने चढणारे अशा विविध कौशल्यांचे तरुण-तरुणी सहभागी आहेत.
आपत्कालीन प्रसंगी संपर्क क्रमांक –
राकेश पाटील – 9226772600
कौशिक पाटील – 9209756048
प्रथमेश वर्तक – 9834960854
भद्रेश म्हात्रे – 8237414068
हर्षल म्हात्रे – 7507010681

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन पंकज म्हात्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लायन भूपेश म्हात्रे यांनी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??