एसटी डेपो नांदेड आगार येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा,कामगार पाल्य व चालकांना बक्षिस वाटप

नांदेड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.15 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी सकाळी ठिक 7.30 वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79 वा वर्धापन स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाचे विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी नांदेड आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्र ध्वजास मानवंदना देण्यात आली.
यावेळी प्रवासी सेवेमध्ये अपघात विरहित विना अपघात सुरक्षित सेवा देणाऱ्या सात चालकांचा विभागीय वाहतुक अधिक्षक तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे व बसस्थानक प्रमुख मा.श्री.यासीन हामीद खान यांच्या हस्ते सुरक्षित सेवेबद्दलचे बॅच बिल्ले बक्षीस देवून सत्कार करून गौरविण्यात आले. यामध्ये 25 वर्षे सुरक्षित सेवा देणारे चालक गोविंद सोनवणे, 15 वर्षे विना अपघात सेवा देणारे चालक गजानन आव्हाड, श्याम शंकर वायवळ, दहा वर्षे अपघात विरहित सेवा देणारे चालक संग्राम केंद्रे, प्रकाश तुपेकर, विजयकुमार आढाव व पाच वर्षे सुरक्षित सेवा देणारे चालक तुकाराम वत्ते यांचा समावेश होता.
यानंतर शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षीक परिक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या कामगारांच्या चार गुणवंत विद्यार्थी पाल्यांना वरील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करून सन्मानीत करण्यात आले. यामध्ये वर्ग 1 ला कु.अद्विका भालेराव (94 टक्के), वर्ग 5 वा कु.सिबा मोहमोदीन हुसेन (100 टक्के), वर्ग 10 वा चिरंजीव क्षितीज कदम (99.60 टक्के), 12 वी मध्ये कु.पल्लवी भुस्सा (83.33 टक्के) यांचा समावेश होता. यावेळी मिलींदकुमार सोनाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात कामगार-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, उत्पन्न वाढ, इंधन बचत, विना अपघात सेवा या विषयी कामगार-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय वाहतुक अधिक्षक मिलींदकुमार सोनाळे, बसस्थानक प्रमुख यासीन हामीद खान, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णू हारकळ, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, लेखाकार सतिश गुंजकर, वाहतुक निरीक्षक सुधाकर घुमे, मयुर तेलंगे, सुधाकर भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्वातंत्र्यदिन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. याप्रसंगी रापम आगारातील कष्टकरी कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.