ताज्या घडामोडी
म्हसवड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरी

भारतीय स्वातंत्र्यदिन 2025 ची म्हसवड पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट
16 लाख रुपये किमतीचे चोरी झालेले, हरवलेले तब्बल 61 मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले
प्रतिनिधी : – बापूसाहेब कांबळे
गेल्या सहा महिन्यात 21 लाख रुपयांचे 78 मोबाईल फोन जे चोरी झालेले आणि हरवलेले होते ते महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोधून आणून नागरिकांना परत केले.हे सर्व मोबाईल महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली,पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात येथून शोधून आणलेले आहेत.