नेर्ले ( ता. वाळवा ) येथील मम्मा प्री स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा…

प्रतिनिधी : – बापूसाहेब कांबळे
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज मम्मा प्री स्कूल नेरले येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे युवानेते देवराज (दादा) पाटील हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई पोलीस सौ. मनीषा कुटे या उपस्थित होत्या त्याचबरोबर प्रमुख मान्यवर येवलेवाडी गावचे सरपंच सौ. पूनम जगताप व स्कूलचे मार्गदर्शक संदीप मोहिते, अनिकेत मोहिते हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. दर्शू जगताप (मॅडम) यांनी केले लहान वयामध्येच मुलांना स्वातंत्र्याचे शिक्षण देणे फार गरजेचे आहे व महापुरुषांच्या इतिहासामुळेच आत्ताची मुलं भविष्यातील इतिहास घडवणार आहेत हे सांगून त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला त्यानंतर स्कूल मधील विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे सादर केली व राष्ट्रगीत घेऊन भारत देशाला स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवराज पाटील (दादा) यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व एवढ्या लहान वयामध्ये विद्यार्थी आत्मविश्वासाने भाषण करतात याचे त्यांनी कौतुक केले स्कूलच्या विविध उपक्रमाचे ही त्यांनी कौतुक केले. लहान वयामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचा इतिहास या विद्यार्थ्यांना सांगणे हे फार महत्त्वाचे आहे आणि ते काम मम्मा प्री स्कूल नेरले चांगल्या पद्धतीने करते हा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुंबई पोलीस सौ. मनीषा कुटे व येवलेवाडी च्या सरपंच सौ. पुनम जगताप यांनीही स्वातंत्र्य दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्कूलच्या शिक्षिका श्रद्धा जाधव (मॅडम) यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.