सांगवी औंध भावसार समाज तर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

दापोडी सांगवी भावसार समाजातील सर्व सभासदांना माझा नमस्कार मेसेज देण्याचा उद्देश हा की दापोडी भावसार समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दिनांक 3 ऑगस्ट रोजी निळू फुले नाट्य मंदिरामध्ये संपन्न झाला कार्यक्रम अतिशय सुरेख पद्धतीने घेण्यात आला मान्यवरांचे स्वागतही व्यवस्थित झाले मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उपदेशात्मक जो पण काही संदेश दिला आहे तो अगदी चांगला होता आणि त्यातून विद्यार्थ्यांनी काहीतरी शिकावे हाच एक त्याचा अर्थ असतो दुसरी गोष्ट अशी की आपले समाजाचे अध्यक्ष श्रीमान रवींद्र जी महिंद्रकर यांनी समाजाबद्दल जे भाषण केले त्यातील काही गोष्टींचा येथे उल्लेख करणे फार गरजेचे आहे रवींद्र साहेबांनी सांगितले की समाजामधील आताच्या कार्यकारणी मंडळामध्ये तेच ते जुने जुने चेहरे दिसत आहेत नवीन चेहऱ्याची काही भर पडत नाही नवीन चेहरे जर आले नाही तर काही काळानंतर समाज होता असे होईल त्याकरिता सर्व युवकांनी आपल्या दापोडी सांगवी भावसार समाजामध्ये आपले सहकार्य देणे खूपच गरजेचे आहे त्यातून आपला समाज हा टिकून राहील काम तर प्रत्येकालाच करायचे असते परंतु समाजामध्ये नवीन नवीन चेहरे जर आले तर समाज पुढे जात राहणार आहे समाजामध्ये राहून मला हे पद भेटलं नाही ते पद भेटले नाही मी कशाला पुढे पुढे जाऊ ही जी काही भावना उत्पन्न होत असते ती व्हायला नको आहे समाजामध्ये राहून विना पदाची काम करणारी माणसे सुद्धा आपल्या समाजामध्ये भरपूर आहेत त्यांचाही नवीन आलेल्या सभासदांनी बोध घ्यावा
दुसरे भाषण झाले ते श्रीमान माननीय समाजभूषण डॉक्टर मारोतराव लांडे साहेब यांचे त्यांच्या भाषणाचा थोडक्यात मतितार्थ सर्वांना समजेल यासाठीच मी मांडत आहे गेल्या चार-पाच वर्षापासून मी स्वतः आपल्या समाजाच्या ग्रुप वरती समाजाला एखादी जागा मिळावी किंवा स्वतःच्या हक्काचा फ्लॅट रहावा याकरता मी व्हाट्सअप वरती भरपूर मेसेज केले त्याची सुरुवातही मी माझ्यापासूनच केली होती जास्त नाही रोजचे पाच रुपये याप्रमाणे महिन्याचे दीडशे होतात त्याप्रमाणे जर आपल्या समाजामध्ये तीनशे चारशे घरांचे कुटुंब आहेत हे सर्व पैसे जर एकत्र केले तर वर्षाकाठी भरपूर पैसे जमा होतात जर नवीन आलेल्या सभासदांना किंवा आपल्या कार्यकारणी मंडळामध्ये असणारे लोकांना जर याबाबतीत काही करायचे असेल तर त्यांचा पहिला हा विचार असेल की आपल्याकडे जमा पैसे किती आहेत त्यावरती पुढचं गणित होऊ शकते जर आपल्याकडे आर्थिक पाठबळच नसेल तर नवीन येणारे सभासद किंवा जे जुने सभासद आहे ते तरी काय करणार म्हणूनच मी फक्त रोजची पाच रुपये याप्रमाणे मी सांगितले होते आणि तसा प्रयत्नसुध्दा केला होता परंतु त्या प्रयत्नांना काही यश आले नाही मी स्वतः हा पर्याय सुचवल्यानंतर 2023 मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने महिना दीडशे रुपये मी आपल्या दापोडी सांगवी समाजाचे बँकेच्या क्युआर कोड मार्फत पैसे दिले होते परंतु एवढे करून सुद्धा कुणीही त्याच्यामध्ये फक्त एक सभासद वगळता कुणीही त्याच्यामध्ये काहीही रक्कम पाठवली नाही जर असे राहिले तर समाजाला आर्थिक पाठबळ कुठे मिळणार आर्थिक पाठबळ जर नसेल तर नवीन नवीन जे सभासद येणार आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या अडचणींचा सामना हा करावाच लागणार आहे म्हणूनच डॉक्टर मारोतराव लांडेसाहेब यांनी भाषणांमध्ये या गोष्टींचा चांगल्या प्रकारे सूचना केलेल्या आहे त्यांनी सुद्धा माझ्या म्हणण्याप्रमाणे आताच्या कार्यकारी मंडळाला आणि नवीन सभासदांना त्यांनी अशी सांगितले आहे कि आपल्या समाजाकरता एखादा फ्लॅट म्हणा किंवा एखादे घर असायला हवे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी ते स्वतः पुढे येणार आहेत ते त्यांच्या पाठीमागे लागून ते काम करून घेणार आहेत असं ते म्हणाले आहेत परंतु जर आर्थिक पाठबळ जर मजबूत नसेल तर त्या गोष्टी सुद्धा होऊ शकत नाही म्हणूनच मी हा पर्याय सुचवला होता परंतु तो पर्याय कोणाच्याही पचनी पडला नाही हे खूप मोठे दुर्दैव आहे
समारंभाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान डॉक्टर बाळकृष्ण रंगदळसाहेब यांचे जे भाषण झाले ते खरोखरच अत्यंत चांगले झाले त्यांनी जे आरोग्य विषयी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूपच काही सांगून जात असतात त्यांची दापोडी सांगवी भावसार समाजातील सर्व लोकांना विना मोबदला सेवा ही दर रविवारी त्यांच्या दवाखान्यांमध्ये दिली जाते त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आपल्या समाजाप्रती आपणही काही देणे लागतो ही त्यांची भावना खूप काही सांगून जाते आपणही त्या भावनेचा खूप आदर केला पाहिजे आणि आपल्याकडूनही तसे काही काम होईल का या चा विचार जरूर केला पाहिजे
या कार्यक्रमासाठी आपण काही मान्यवर लोकांना आमंत्रित केले होते पैकी माननीय श्रीमान प्रशांत शितोळे साहेबांनी अत्यंत मोजक्या शब्दात खूप काही चांगले विचार मांडले आहेत ते विचार आपल्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असेच त्यांनी विचार मांडले आहेत असे विचार मांडल्याबद्दल श्रीमान प्रशांत शितोळे साहेबांचे खूप खूप आभार धन्यवाद
या कार्यक्रमासाठी कार्यकारी मंडळातील सर्व सभासदांनी खूपच मेहनत घेतली होती दोन-तीन महिन्यापासून त्यांचे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते सारखे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे माहिती देत होते तसेच आपले बँकेचा क्यूआर कोड सुद्धा देत होते त्या गोष्टीचा ते सतत पाठपुरावा करत होते समाजातील काही दानशूर व्यक्तींनी त्या क्यू आर कोड मार्फत आपली देणगी या समारंभासाठी दिली त्या सर्वांचे खूप खूप आभार
मी सचविलेल्या प्रस्तावाचा जर कार्यकारी मंडळातील सदस्यांनी पाठपुरावा केला असता तर तीन चार वर्षांमध्ये समाजाच्या बँकेच्या खात्यामध्ये पुष्कळ रक्कम जमा झाली असती ..असो
अजूनही वेळ गेलेली नाही आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे तरी त्या गोष्टीचा जर पाठपुरावा केला तर ते समाजाच्या हितासाठी खूपच चांगले होईल त्यामुळे समाजाचा आर्थिक पाया खूप मजबूत होईल आणि या गोष्टीमुळे समाज हित साधले जाईल आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत याचा सुद्धा आनंद घेता येईल.माझा हा मेसेज अजून एक गोष्ट सांगितल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ती गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित असलेल्या महिला मंडळांतील सर्व महिलांचा सहभाग
कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन महिला मंडळ कडे होते ही अतिशय उल्लेखनीय बाब लक्ष वेधून घेत होती मंचावरती सर्व महिलांचा मुक्तपणे वावर होत होता ही खूप अतिशय चांगली गोष्ट आहे
डॉ. सौ. नंदाताई राशिनकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच जे सूत्रसंचालन करत होत्या ते अगदी वाखाणण्यासारखे आहे त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम हा नेहमीच लक्षणीय प्रेक्षणीय असा होतो यात शंकाच नाही त्यांच्या संबोधनांमध्ये एक नियोजनबद्धता असते लवचिकता असते ते ऐकावे असेच वाटते
कार्यक्रमांमध्ये मी बसलेल्या रांगेच्या पुढच्या रांगेमध्ये एक विद्यार्थी होता त्यांनी त्या मुलाचे विचारपूस केली विचारपूस करताना असे आढळून आले की तो मुलगा उच्चशिक्षित आहे त्याने जो विषय निवडला होता त्या विषयाला धरून त्यांनी त्या मुलाला आपल्या सोबत घेऊन कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या भावसार समाजातील नामांकित महिला सौ. स्मितल फुलकर यांच्याशी त्यांनी ओळख करून दिली यात त्यांचं खूप मोठं महानपण आहे आणी समाजाप्रती असलेली ओढ हे दिसून येते.• त्यांचेही खूप खूप आभार कार्यक्रमाच्या शेवटी भोजन समारंभ हा खूपच चांगल्या पद्धतीने झाला भोजन व्यवस्थेची ज्यांनी जबाबदारी स्वीकारली होती त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आभार