ताज्या घडामोडी

पवित्र श्रावणमासी श्री साई गजानन सेवा मंडळाची कपिलेश्वर पायी वारी संपन्न

सालाबाद प्रमाणे यावर्षी श्री क्षेत्र अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर पायीवारी आयोजित करण्यात आली सकाळी साडेपाच वाजता मोठेबाबा मंदिरावर महाआरतीसाठी मंडळाचे सर्व कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी हजर होते महिला भगिनी देखील महाआरतीला हजर होत्या प्राथमिक स्वरूपात मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील सचिव विठ्ठल आप्पा पाटील यांनी आरती केली सहा वाजता गण गण गणात बोते चा मंत्र म्हणत सुमारे 220 भक्त भाविक कपलेश्वर जाण्यासाठी निघाले टाळ मृदंगाचा गजर हर हर महादेव गर्जना भगवे झेंडे धरून आनंदाने नाचत चालणारे भाविक कॉलेजच्या जवळ जितेंद्र बोरसे यांनी राजगिरा लाडू प्रसाद प्रत्येक भक्तांना दिला पुढे वारी धार येथे पोहोचली धारला शशिकांत पाटील यांनी वारकऱ्यांसाठी टेंट टाकून मोठी व्यवस्था केली होती त्या ठिकाणी साबुदाणा खिचडी प्रसाद सर्व वारकऱ्यांना दिला चहा ही दिला मंडळाचे प्रतिनिधिक स्वरूपात त्यांनी अध्यक्ष सचिव तसेच गुणवंत पवार, आर व्ही पाटील,लक्ष्मण निकम दादा ,तुळशीराम अण्णा,विश्राम महाराज विणेकरी महाराज यांचा टोपी रुमाल देऊन श्रीफळ देऊन सन्मान केला त्यांनी मंडळाला सेवा दिले म्हणून माऊलींचा प्रसाद देखील शशिकांत पाटील व त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल जावई त्यांना टोपी टॉवेल देण्यात आला संपूर्ण गावांमध्ये पालखीच्या आरत्या करत वारी पुढे मार्गस्थ झाली पुढे मारवड पेट्रोल पंपावर ज्ञानेश्वर शांताराम पाटील यांनी प्रत्येक वारकऱ्याला चिवडा पाकीट वाटप केले त्या ठिकाणी पाण्याची थंड पाण्याची व्यवस्था केलेली होती त्यांचा प्रसाद घेऊन त्यांना देखील त्यांना ठिकाणी सन्मानित करण्यात आलं माऊलीचा प्रसाद देण्यात आला. पुढे वारी हर हर महादेव, गण गण गणात बोते म्हणत मारवाड ला कालभैरव मंदिरावर पायीवारी पोहोचले त्या ठिकाणीदेखील मंदिराचे ट्रस्टी आयोजक मुकेश आप्पा साळुंखे यांनी महाप्रसादाचे आयोजन केलं होतं सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी महाप्रसाद देण्यात आला कालभैरव मंदिराचे अध्यक्ष निंबा पाटील यांचं स्वागत एस एम पाटील आप्पा यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर मुकेश आप्पा साळुंखे एल जी चौधरी सर संजय साळुंखे, शांताराम पाटील,प्रवीण पाटील, नरेंद्र पाटील माँ जिजाऊ जेष्ठ महिला मंडळ च्या रजनी पाटील योगिता डहाळे यांचा देखील सत्कार करण्यात आला
तेथुन अतिशय हर्ष उल्हासात वारी पुढे चालत निघाले रस्त्यावर किशोर चौधरी यांनी चिक्कींचे वाटप केलं याच ठिकाणी चाकवेकर दिलीप राजाराम पाटील, नितीन नीलकंठ पाटील ढेकु यांनी खजूर पाकिटाचे वाटप केलं पुढे कळमसरे येथे पिंटू भाऊ राजपूत सरपंच साहेब यांनी वारकऱ्यांचे मोठे स्वागत केले त्या ठिकाणी महाप्रसादात राजगिरा लाडू, केळी ,उपास चिवडा प्रत्येक वारकऱ्याला देण्यात आला मंडळाचे वचने वतीने पिंटू भाऊ राजपूत ,प्रदीपसिंग राजपूत यांचा सन्मान बोढरे व जितेंद्र बोरसे यांनी केला कळमसरे स्टॅन्ड ला श्री भालचंद्र हिम्मत चौधरी यांनी चहाचे आयोजन केले होते तिथून वारी हर्षवला साथ निमला पोचली त्या ठिकाणी छोटू भाऊ=सौ छायताई यांनी लिंबू सरबताच आयोजन केले होते सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी लिंबू सरबत देणे देण्यात आले सतसंग या ठिकाणी झाला पुढे वारी कपिलेश्वर जवळ पोहोचते तोपर्यंत कपिलेश्वर कपिलेश्वर मंडळ ट्रस्टचे मगन भाऊसाहेब सी एस पाटील, तुकाराम पाटील पुढे येत झाले व त्यांनी वारीस पालखीस मानवंदना देऊन स्वागत केलं वारी माऊलीच्या दरबारामध्ये पोचल्यानंतर पालखी महाप्रवचन हॉलमध्ये स्थानापन्न करण्यात आली कपिलेश्वर संस्थांच्या वतीने श्री साई गजानन सेवा मंडळ चे अध्यक्ष पाटील आप्पासो शिवाजीराव मोहन पाटील यांना मानाचे श्रीफळ देऊन गादीपती महामंडलेश्वर श्री हंसांनंदजी तीर्थराज महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर मंडळाचे सचिव विठ्ठल भावराव पाटील, कै नामदेव बापू यांचे नातु पत्रकार राकेश पाटील, चंद्रकांत नामदेव पाटील, गुणवंत पवार वाल्मीक मराठे, डहाळे सर, आर व्ही पाटील, मोठा भाऊ, समाधान भाऊ, संभाजी पाटील, महाले सर शनि महाराज, विश्राम महाराज यांचा सन्मान कपिलेश्वर संस्थांच्या वतीने करण्यात आला करण्यात आला पायी वारीच्या महाप्रसादासाठी 11000 रक्कम देणारे निळकंठ सोनवणे यांचा देखील हंसांनंदजी महाराज यांच्या हस्ते ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच श्री साई गजानन मंडळाच्या वतीने गादी पती हाऊस आनंद जी हाऊस आनंद तीर्थराज महाराज 1008 यांचा सन्मान सर्व मंडळ यांनी केला त्याचबरोबर मगन भाऊसाहेब, सी एस पाटील सर, तुकाराम पाटील स्वयंपाकी दादा यांचा देखील सन्मान करण्यात आला मेन हॉलमध्ये महा सत्संग होऊन सर्व वारकऱ्यांनी हौसा नंदजी तीर्थराज महाराज यांचे पदस्पर्श करून कपिलेश्वर भगवान यांचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी मंदिर संस्थांच्या वतीने आयोजित केलेलं वरण बट्टी, शिरा ,भाजी महाप्रसाद घेऊन वारकरी आनंदाने परतते झाले परतले सर्व वारकऱ्याचं श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष यांनी आभार मानले सर्वांना धन्यवाद दिले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??