दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

परळी / प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष परिपाठ घेऊन त्यांच्या जीवन व कार्यावर प्रकाशझोत टाकला.तसेच विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्याचा विकास व्हावा, या उद्देशाने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी’शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे’आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सर्वप्रथम ‘भारतीय असंतषाचे जनक’ म्हणून सर्व परिचित असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,वक्तृत्व कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्यावर शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ही स्पर्धा पाचवी व सहावी आणि सातवी व आठवी या दोन गटांमध्ये घेण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व मराठी या तीनही भाषेतून लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. सदरील शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर व शाळेचे वरिष्ठ समन्वयक श्री.सुनील येवले सर यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्राचार्य मा.श्री. श्रीकांत पाटील सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले .यामध्ये त्यांनी समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा,यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या ‘सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव ‘याबद्दल माहिती दिली. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदानही सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कु.कुंजल शिंदे व कु. प्रसिद्धी बिंगोले यांनी तर आभार प्रदर्शन कु.पायल सोळंके हिने केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदरील कार्यक्रमास स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम ,शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते सर (सचिव,त्रिपुरा सरकार) व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.