प्लास्टिक प्रदूषणावर प्रभावी उपाय , सेंट जॉन कॉलेजच्या आदित्य सिंग आणि टीमचा प्रथम क्रमांक

पालघर नगरपरिषद आणि सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता इनोव्हेटिव टेक्नॉलॉजी चॅलेंज २०२५ या स्पर्धेमध्ये सेंट जॉन इंटरनॅशनल इंजीनियरिंग कॉलेजच्या डिग्रीच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण कल्पनांमध्ये इन्सिनरेशनः प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी शाश्रत उपाय या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला आहे.
सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. कमल शाह आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित केले. या अभिनव प्रकल्पामध्ये आदित्य सिंग (एस जे सी ई एम एआयएमएल डिपार्टमेंट), वैभव सोमन्ना (एस जे सी ई एम डेटा सायन्स डिपार्टमेंट) कार्तिक पिंपळे (एस जे सी ई एम कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट), ऋत्वी पाटील (एस जे सी ई एम कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट), प्रगती यादव (एस जे सी ई एम कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट) आणि विधी जैन (एस जे सी ई एम डेटा सायन्स डिपार्टमेंट) या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एक महत्वपूर्ण समस्या, प्लास्टिक कचरा यावर शाश्वत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय सादर केला.
इन्सिनेरशन ही एक कचरा व्यवस्थापन प्रक्रिया आहे ज्यामध्ये गोळा केलेले प्लास्टिक ते कठीण असो वा मऊ विशेष सुविधांमध्ये उच्च तापमानात जाळले जाते. प्लास्टिक जैवविघटनशील नसल्यामुळे आणि नैसर्गिकरित्या विघटित होण्यास शेकडो ते हजारो वर्षे लागू शकतात, त्यामुळे इन्सिनेरशन प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी जलद उपाय प्रदान करते. प्लास्टिक जाळल्याने डायऑक्सिन, फ्युरन्स आणि कार्बन मोनोऑक्साइड सारखे विषारी वायू बाहेर पडू शकतात, तर आधुनिक इन्सिनेरेशन प्लांट्समध्ये प्रगत वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली जसे की स्क्रबर, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रीसिपिटेटर्स आणि सक्रिय कार्बन फिल्टर्स सुसज्ज आहेत जे वातावरणात सोडण्यापूर्वी हे उत्सर्जन शुद्ध करतात. शिवाय, जाळल्यानंतर उरलेल्या राखेचे अवशेष टिकाऊ, पर्यावरणपूरक विटा तयार करण्यासाठी सिमेंट आणि वाळूमध्ये मिसळता येतात. या विटा केवळ कच्च्या मालाची मागणी कमी करत नाहीत तर औद्योगिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा एक शाश्वत मार्ग देखील देतात. अशा प्रकारे, इन्सिनेरेशन हानिकारक प्लास्टिक कचरा काढून टाकण्यास मदत करतेच, परंतु पर्यावरणाची हानी कमी करताना त्याचे मौल्यवान संसाधनात रूपांतर देखील करते.
परीक्षकांकडून या संकल्पनेचे विशेष कौतुक झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेला दृष्टिकोन केवळ पर्यावरण रक्षणासाठीच नव्हे, तर हरित भारत आणि स्वच्छ भारत अभियानास चालना देणारा ठरला.
या स्पर्धेद्वारे नव्या पिढीतील सर्जनशीलतेला आणि सामाजिक भानाला एक इकाचे व्यासपीठ मिळाले असून, असा उपक्रमांमुळे पर्यावरण पुरक भविष्यासाठी भकम पाया तयार होत आहे. पालघर नगर परिषद व सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन होत आहे.