फड मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे बालयोगी ह भ प हरिहर महाराज दिवेगावकर यांची सदिच्छा भेट

परळी (प्रतिनिधी ) परळी शहरातील फड मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल शिवाजी चौक परळी अंबाजोगाई रोड येथील हॉस्पिटल डॉ. पांडुरंग गंगाधर फड साहेब यांच्या हॉस्पिटलला बालयोगी विद्यावचनस्पती ज्योतिष भूषण ह .भ. प. भागवताचार्य रामायणाचार्य हरिहर महाराज दिवेगावकर यांनी सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद देण्यात आले यावेळी फड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. पांडुरंग फड, डॉ. सौ शुभांगी पांडुरंग फड -मुंडे, डॉ. सिद्धेश्वर फड यांच्या वतीने डॉ फड साहेबांनी ह भ प हरिहर महाराज दिवेगावकर यांना संपूर्ण आहेर देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संत पूजनाचा सोहळा भक्तीभावाने पार पाडण्यात आला आशीर्वाद रुपी ह भ प बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांनी हॉस्पिटल मधील सर्व सुविधाची पाहणी करून सर्व सुविधायुक्त असे हॉस्पिटल आपल्या परळी शहरात रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉ. फड साहेबांना त्यांनी आशीर्वाद दिले व रुग्णांची उत्तरोत्तर सेवा घडावी अशी प्रार्थना करण्यात आली फड हॉस्पिटलच्या वतीने ह भ प बाल योगी हरिहर महाराज दिवेगावकर यांचे यांनी आशीर्वाद देण्यात आले .
ह भ प बालयोगी हरिहर महाराजांनी डॉ साहेबांबद्दल सांगितले मी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहूनही आशीर्वाद दिले त्यावेळी अगदी गोरगरीब जनतेची आदराने थोरा मोठ्यांचा मान ठेवून त्यांची आपुलकीने विचारपूस करत अत्यंत अल्प दराने पेशंटला उपचार करून बरे करणारे व वारकरी संप्रदायावर अत्यंत निष्ठा श्रद्धा ठेवून साधू संतांची सेवा करणारे आदर्श डॉ. पांडुरंग फड साहेब यांच्या सारखे डॉक्टर समाजात असल्यामुळे पेशंट लवकरात लवकर पूर्ण पणे बरे होतात आणि त्यांच्या मनात डॉक्टर विषयी आदराची भावना व्यक्त होते असे महाराजांनी सांगितले यावेळी फड मल्टी स्पेशालिस्टच्या वतीने वारकरी संप्रदायातील महाराज गायक वादक सर्व गुणी जनांचा आदर सत्कार करण्यात येणार असे म्हणाले.