ताज्या घडामोडी

*माँ जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गिरनार धबधबा, चंपा सरोवर सहल संपन्न

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एसएम पाटील *माँ जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गिरनार धबधबा, चंपा सरोवर सहल संपन्न* दि. 30=7=2025 रोजी माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर, यांच्या वतीने सहलीचे आयोजन मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी पाटील शोभा पाटील सचिव व सर्व टीमच्या माध्यमातून एक दिवशीय सहल आयोजित केली होती ठरल्याप्रमाणे,स्थळ शबरी धाम येथे जाऊन त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्य याचा सर्व महिला भगिनींनी आनंद घेतला, पंपा सरोवर, गिरमान धबधबा या ठिकाणी नैसर्गिक पडणारेपाणी हा जीवनातला सुंदर असा नजारा याच याच देही–याच डोळा।। पाहण्याचा जीवनातला सर्वोत्कृष्ट क्षण महिला भगिनींनी डोळ्यात साठवला, कैनया मंदिर,दर्शन करण्यात आले असे सगळ्यांनी निसर्गाचा आनंद लुटला ऐकून 35 महिलां ट्रीप साठी सहलीसाठी आलेल्या होत्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गीतांच्या माध्यमातून प्रवास कुठेसुरू झाला आणि कुठे संपला हे समजलेच नाही ट्रिपच आयोजन साठी पुजाताई,उषाताई, यांच लाख मोलाच सहकार्य लाभले,अध्यक्ष =रजनी पाटील पूजा पाटील शोभा पाटील यांनी यांनी सगळ्यांचे आभार मानले, लवकरच पुढील तीन दिवसासाठी ची ट्रीप आपण काढू अशा बाबा अशा बाबतीत मनोदय मंडळाचे अध्यक्ष त्यांनी व्यक्त केला

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??