वांगी बुद्रुक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन
दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वांगी बुद्रुक गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्रीमती ज्योती साळवे तसेच बाळू साळवे यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यानंतर ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी सिल्लोड पोलीस ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यतीन कुलकर्णी तसेच पोलीस कर्मचारी रामेश्वर जाधव यांच्या हस्ते लोकशाहीर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभिवादन कार्यक्रम प्रसंगी शालेय अध्यक्ष असलम पठाण यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थित गावकऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक एल आर कोळी, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, सोसायटी चेअरमन माधवराव साळवे, सोसायटी व्हाईसचेरमन रघुनाथ साळवे ,माजी पोलीस पाटील भगवान साळवे,सैसायटी सदस्य पंडित काकडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष काकडे, माधवराव तायडे,ग्रामरोजगार सेवक सुरेश साळवे,सामाजिक कार्यकर्ते संतोष साळवे,जेबास पठाण,आबा साळवे,धनराज नैनाव,गणेश साळवे,दिपक काकडे,अफसर पठाण,सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गायकवाड,सोमीनाथ सुरडकर,शेख कलीम,रतन गायकवाड, संपत गायकवाड,संजय निकाळजे, गजानन गायकवाड,लतीफ शहा,शेख कलीम,नईम पठाण, दौलत गायकवाड,सुनिल नवटे, वैभव निकाळजे, प्रवीण निकाळजे यश गायकवाड ,रोहीत गायकवाड यांच्यासह शालेय शिक्षक कृष्णा सपकाळ,संतोष दाभाडे, शिक्षीका वैशाली काकडे, कल्याणी तुपे अंगणवाडी सेविका वैशाली काकडे,मंजुषा कुलकर्णी, ताराबाई काकडे,कौसाबाई शेंद्रे यांच्यासह आदी गावकरी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.