अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अंतर्गत रणाईचे येथे वक्ता कार्यशाळा शिबिर संपन्न

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील *अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अंतर्गत रणाईचे येथे वक्ता कार्यशाळा शिबिर संपन्न दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी माध्यमिक विद्यालय रणाईचे तालुका अमळनेर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत वक्ता म्हणून सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक तथा अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील सर उपस्थित होते माध्यमिक विद्यालय रणयचे रणाईचे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थी च्या सभेस श्री डी एम पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्य वर जन्मापासून तर अखेपर्यंत संबंधित माहिती दिली शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना देखील वक्ता प्रशिक्षणामध्ये संधी देण्यात आले याप्रसंगी संस्थेचे समन्वयक श्री शिंदे सर, मुख्याध्यापिका रीना पाटील मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ठाकरे सर व आभार प्रदर्शन श्री कापडणे सर यांनी केले युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अशोक पवार सर यांनी वक्ता कार्यशाळा अभियान सुरू केल्या असून स्वातंत्र्य चळवळीत ज्यानीआपल्या प्राणाची बाजी लावली आशा थोर महातम्यांच्या जयंतीनिमित्त व पुण्यतिथी निमित्त वक्ता कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत