के.जी.जी स्कूल व फिनिक्स पब्लिक स्कुल येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

परळी/प्रतिनिधी
के.जी.जी स्कूल व फिनिक्स पब्लिक स्कुल हाळम येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.हालम येथील के.जी.जी स्कूल व फिनिक्स पब्लिक स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.माधव मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रा वर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित मार्गदर्शिका ज्ञानेश्वरी फड मॅडम ,आय टी आय प्राचार्य सोमेश मुंडे सर ,शाळेचे मुख्याध्यापक पिंपळे सर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जाधव मॅडम यांनी करत कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व स्टाफ ने कठोर परिश्रम घेतले.