ताज्या घडामोडी
आमदार जयंतराव पाटील आणि सांगली जिल्हा मध्य.सह.बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शिराळा प्रतिनिधी
इस्लामपूर येथील तहसील कार्यालय समोर आज (ता. १ ऑगस्ट) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती निमित्त कार्यक्रमात माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या थेट वंशज बयाबाई लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर अध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, गोटखिंडी सरपंच विजय लोंढे, सागर चव्हाण, सुधाकर वायदंडे, पाटोळे, संतोष चांदणे, उत्तम चांदणे, सुधाकर वायदंडे, प्रवीण बडेकर, शंकर महापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.