ताज्या घडामोडी
कुंडलवाडी येथे लोकनेते राजारामबापू पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

ग्रामपंचायत कुंडलवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली व यशवंतराव चव्हाण सार्वजनिक वाचनालय, कुंडलवाडी यांचे विद्यमाने लोकनेते राजारामबापू पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी सागर वाडेकर, उपसरपंच समीर फकीर, सदस्या सौ. विन या कदम, कुमार वायदंडे, माजी उपसरपंच अजित कदम नाना, जमीर पटेल, माजी उपसरपंच असिफ पटेल, आफताब पटेल , रमजान पटेल, बावाशा फकीर, असलम मुल्ला, फिरोज पटेल, उत्तम कदम, विशाल कदम तसेच आयुब बारगीर, अमोल माने, दूल्हे खान पटेल उपस्थित होते. स्वागत बावशा फकीर. मनोगत कुमार वायदंडे यांनी केले. शेवटी वाचनालयाचे अध्यक्ष श्री विजयकुमार कदम सर यांनी सर्व व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.