ताज्या घडामोडी

दीनानाथ घारपुरे पुरस्काराने गौरव – अरविंद सुर्वे यांचा नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानाला सन्मान

नाट्यसृष्टीत सातत्याने समर्पित कार्य करणारे कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, मुंबई संस्थेचे कार्यवाह श्री. अरविंद रामकृष्ण सुर्वे यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “कलाश्रम”च्या दीनानाथ घारपुरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.स्वातंत्र्यसैनिक परशुराम पाटील यांच्या “कलाश्रम” संस्थेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या “अभियान सन्मान” उपक्रमाच्या अंतर्गत, पद्मश्री अच्युत पालव यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार ३० जुलै २०२५ रोजी मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे एका देखण्या समारंभात प्रदान करण्यात आला.या प्रसंगी श्रीमती घारपुरे ताई, कलाश्रमचे श्री. नंदकुमार पाटील, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ फेम विसुभाऊ बापट यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.श्री. अरविंद सुर्वे यांचा नाट्यक्षेत्रातील वैविध्यपूर्ण कार्यप्रवास प्रेरणादायी असून, त्यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण भंडारी समाजात तसेच मराठी रंगभूमीत आनंदाची लहर उसळली आहे.कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, मुंबई संस्थेच्या वतीने श्री. अरविंद सुर्वे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील कार्यास अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??