ताज्या घडामोडी

व्हीजन ॲकॅडमी मुळे मोफत कौशल्य मिळवण्याची संधी – अजिंक्य कुंभार…

विवेकानंद संस्थेच्या स्कील संटेरचे उद्धाटन-विद्यार्थ्यांना मोफत शिकता येणार ——

शिराळा प्रतिनिधी

विवेकानंद सहकारी संस्थेमुळे शिराळा तालुक्यातील ग्रामिण विद्यार्थ्यांना व्हीजन अॅकॅडमी मार्फत मोफत कौशल्य प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली आहे .त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाळवा पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी केले.व्हीजन ॲकॅडमीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.राजेंद्र उर्फ चिमण डांगे,विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक,प्रसिद्ध अर्थतज्ञ प्राचार्य डॅा.पी.बी.कुलकर्णी हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर संजय परमणे हे होते.

येथील विवेकानंद शेतीमाल प्रक्रिया व पुरक सह.संस्थेला भारत सरकारच्या पंतप्रधान कौशल्य अभियान व महाराष्ट्र सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियाना अंतर्गत मंजूर केलेल्या ॲटोमोटिव्ह कौशल्य विकास परिषद यांच्या कडून स्कील सेंटर मिळाले आहे.संस्थेच्या व्हीजन ॲकॅडमी कडून हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे.या प्रशिक्षणाचा शुभारंभ देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालय चिखली येथे झाला.विवेकानंद संस्था व नाईक महाविद्यालय हे संयुक्तरीत्या प्रशिक्षण देणार आहे.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे स्वीकृत संचालक श्रेयस महाजन यांनी केले व या स्किल सेंटर ची सविस्तर माहिती दिली.यामध्ये १० वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीक व्हेईकल सर्व्हीस टेक्निशियन हा कोर्स करता येणार आहे.हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे असे सांगितले.यावेळी सुमंत महाजन,स्वानंद महाजन,बी.टी.निकम व श्रेयस महाजन यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना उद्योजिका सौ.सुखदा महाजन म्हणाल्या की देशातील इंधन साठे कमी आहे,भविष्यात हे साठे केंव्हा संपतील हे सांगता येत नाही.देशाला आत्मनिर्भर व्हायचे आहे त्यामुळे आता देशातील इलेक्ट्रीक वाहानांची संख्या वाढणार आहे.त्यामुळे यामधील तंत्रज्ञांची मागणी प्रचंड असणार आहे त्यामुळे आम्ही हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.भविष्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी कोर्स सुरू करण्यात येणार आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.एस.आर.पाटील म्हणाले की विवेकानंद संस्था व आपले महाविद्यालयाने तुमच्यासाठी चांगली संधी प्राप्त करून दिली आहे.नेहमीचे शिक्षण घेत घेत हा कोर्स करता येतो.तसेच हा कोर्स पूर्णपण मोफत असुन त्याचा लाभ घ्यावा आहे.इलेक्ट्रीक दुचाकी वाहानाची संख्या प्रचंड वाढणार आहे त्यामुळे स्वतःचा व्यवसाय,अथवा मोठ्या वहान कंपनीत नोकऱ्या मिळू शकतील.

ॲड.चिमण डांगे म्हणाले की सध्या प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.पण आपल्याकडे कौशल्य असणारे लोक मिळत नाहीत.सुतारकाम करणारे,नळ दुरुस्त अशा शेकडो तंत्रज्ञांची गरज आहे.आज एआय चा जमाना आला आहे त्यामुळे हळूहळू नोकऱ्या जात आहेत विविध नामवंत कंपन्यातील एक लाख कर्मचाऱ्यांच्या नोकर्या जाणार आहेत .त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारीत कोर्स करून स्वतःचे व्यवसाय करणे गरजेचे आहे.व्हीजन ॲकॅडमीने जो कोर्स सुरू केला आहे तो पूर्ण करून स्वावलंबी बनावे असे आवाहन करून डांगे महाविद्यालयाचे उदाहरण दिले.

उद्घाटक अजिंक्य कुंभार म्हणाले की शिराळा तालुक्यातील विद्यार्थी प्रचंड मेहनत करणारे आहेत त्यामुळे हा कोर्सकरून आपल्या कौशल्यात भर टाकणे गरजेचे आहे. इच्छाशक्ती प्रचंड असेल तर कांहीही साध्य करता येते असे सांगुन अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.मुलानी ध्येयवादी असल्या शिवाय यश मिळत नाही.अडचणी आणि कोणतेही प्रसंग वाट्याला आले तरी त्यावर मात करून वाटचाल केली तर यश मिळते.महाजन कुटुंबीयानी जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय परमणे म्हणाले कुठलाही विषय वेळेत समजला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.कौशल्य शोधले पाहिजे असे सांगुन ते म्हणाले कि पाच वर्षांपूर्वी आपल्या देशात ६००० वेगवेगळे उद्योग करणारे समुह होते कालांतराने हे उद्योग करणाऱ्यांना विविध जातीत संबोधले जाऊ लागले उदाहरण सुतार,चांभार इत्यादी म्हणजे आपल्याकडे कौशल्य आहे त्याचा शोध घेऊन स्वतःचा विकास केला पाहिजे.सध्या आपल्याकडे नवीन शैक्षणिक धोरण आले आहे त्यात याचा विचार केला आहे.सातत्याने नवनवीन प्रयोग केले पाहिजेत हे करताना विद्यार्थी चांगले नागरीक बनतील याचा विचार केला आहे. आज संस्थेला इलेक्ट्रिक व्हेईकल सर्व्हीस टेक्निशियन कोर्सचा शुभारंभ झाला आहे.या कार्यक्रमाला दत्त पत संस्थेचे चेअरमन प्रा.डॅा.श्रीकांत चव्हाण,बजरंग कदम,वाळवा पंचायत समितीचे अधिकारी आंबे,प्रा.डॅा.सौ.निता जोखे,प्रा.डॅा.डी.आर.पाटील,महाजन उद्योग समुहाचे कर्मचारी,दिनदयाळ सूत गिरणीचे लेबर ॲाफीसर आदित्य यादव, प्रा.यादव ,सर्व प्राध्यापक इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वानंद महाजन,श्रेयस महाजन,सौ. शालवी महाजन,नाईक महाविद्यालयाचे प्रा.सुतार यांनी परीश्रम केले.आभार बी.टी.निकम यांनी मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??