ताज्या घडामोडी

आदिवासी कोळी महादेव जमातीचा गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न

आदिवासी कोळी महादेव जमातीचा गुणवंत विद्यार्थी व
नवनियुक्त कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न
नांदेड – जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील तमाम सकल आदिवासी कोळी महादेव जमातीच्यावतीने दि.9 ऑगस्ट 2025 शनिवार रोजी हॉटेल राजयोग पॅलेस, नमस्कार चौक नांदेड येथे दुपारी ठिक 2 वाजता चालू शैक्षणिक वर्षात प्राविण्य प्राप्त दहावी, बारावी, व्यावसायीक अभ्यासक्रम प्रवेश पात्र, उत्तीर्ण, शालेय स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, क्रिडा, संगीत क्षेत्रात उल्लेखनिय यश संपादन केलेल्या विद्यार्थी व संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, बँकिंग, रेल्वे, पोलिस व विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या चाळीस कर्मचाऱ्यांचा नव्याने रूजू झालेल्या परभणी शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी मंजुषा कल्लेवाड व उपशिक्षणाधिकारी बालाजी येरमुनवाड, ज्यु.गटात बास्केटबॉल संघात देशाचे प्रतिनिधीत्व करणारी बालीका कुमारी रितीका बालाजी नाईकवाड यासह, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र शिष्यवृत्तीधारक, सेट-नेट उत्तीर्ण अशा ऐंशी विद्यार्थी-विद्यार्थीनींना व तसेच सहा आदर्श व्यक्तीमत्वांना समाजभूषण पुरस्कारर्थींना सन्मानचिन्ह, पुष्पहार, शाल व गौरवपत्र प्रदान करून ह्दय सत्कार करून सन्मानीत करण्यात आले.
या गुणवंत सन्मान सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.धाराशिव शिराळे यांनी उपस्थित गुणवंतांना संबोधीत केले. साहित्य व क्रांतीचा इतिहास असलेली कोळी महादेव जमात शैक्षणिक, सांस्कृतिकदृष्ट्या विकसित होत असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आरक्षणाचा लाभ घेत आणखी यशाची उंच-उंच शिखरे गाठावीत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आदिवासी कोळी महादेव जमातीच्या न्याय हक्काच्या संघर्षासाठी गेली चार दशके जीवाचे राण करून समाजाच्या विकासासाठी शासन, प्रशासन, न्यायालयीन लढे उभारून समाजाच्या उन्नतीस प्रबोधन करणारे सहा सामाजिक कार्यकर्ते मा.यादवराव तुडमे, बी.एल.बैनवाड, आनंदराव रेजीतवाड, शंकरमामा पुट्टेवाड आणि दिगंबर जगताप, गुणवंत एच.मिसलवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते कोळी महादेव जमात भूषण पुरस्काराने सन्मानचिन्ह, गौरवपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून समाजाचे ज्येष्ठ नेते मा.श्री.नागनाथ घिसेवाड, चंद्रकांत गुंगेवाड, शशिकांत भूसेवाड, रमेश पिठ्ठलवाड, के.एन.जेठेवाड, चंद्रमोहन चिंतल, वसंत कलंबरकर, डॉ.बालाजी आदमपूरकर, गंगाधर अनपलवार, माधव पुनवाड, डॉ.विठ्ठल शेटवाड, केशव कुकूलवार, बाळासाहेब उलगूलवाड, भालचंद्र मोळके, प्रा.भगवान गुंजलवाड, केशव जिंकलवाड, संदीप चिमलवाड, माधवराव रेड्डेवाड, विरभद्र मिरेवाड, मारोती बिच्चेवार, गुणवंत एच.मिसलवाड, शिवाजी इरलवाड, पुंडलिक मोरे, राजू मद्देवाड, बालाजी काजलवाड, मारोती पिल्लेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादाराव कोठेवाड यांनी केले तर सुरेख असे सुत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर मरकंटे यांनी केले. आभार प्रदर्शन गिरीष गलांडे यांनी मांडले. या कार्यक्रम सोहळ्यास संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील समाज बंधू-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लगेचच उल्पोपहाराचा स्वाद सर्व उपस्थितांनी घेतला.

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??