पलूसकर शैक्षणिक संकुलात आजी -आजोबा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न…

आजी-आजोबा आले नातवांच्या भेटीला..
शिराळा प्रतिनिधी
आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहु.शिक्षण संस्थेच्या माधवराव परांजपे शिशुविकास मंदिर येथे “आजी – आजोबा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बालवाडी विभागातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी व सर्व शिक्षकांनी आजी-आजोबांचे औक्षण केले.फुलांच्या पायघड्या आणि सुंदर रांगोळी रेखाटनाने सर्वांचे मन प्रसन्न झाले.संस्थेचे संस्थापक मा.श्री उदय परांजपे साहेब,उपाध्यक्ष- श्री.रावळभाऊ, सचिव- श्री.शहा साहेब,संचालक -श्री.संजयदादा परांजपे ,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.करांडे सर,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांच्याहस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री.जाधव सरांनी प्रास्ताविक केले सर्व उपस्थितांचे स्वागत करून आजी- आजोबा दिवस का साजरा केला जातो त्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
सूत्रसंचालन सौ.मोरे मॅडम यांनी केले.श्री.करांडे सरांनी आपल्या मनोगतातून सद्यस्थितीतील कुटुंब व्यवस्थेवर प्रकाश टाकला.तसेच संस्थेचे सचिव श्री.शहा साहेब यांनी आपल्या मनोगतातून आजी- आजोबा व नातवंडे यांच्या नात्यांतील घट्ट विण यांवर मार्मिक शब्दात वर्णन केले.सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पूजन केले.या कार्यक्रमाने सर्व आजी आजोबा भारावून गेले.तसेच ते भावुक झाले,काही आजी आजोबांना गहिवरून आले.
यावेळी अनेक आजी आजोबांनी आपली मनोगते उत्स्फूर्तपणे मांडली.सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पद्य पूजन केले.तसेच आलेल्या आजी- आजोबांनी आपल्या मनोगतातून
या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.मुलांच्यावर योग्य संस्कार होण्यासाठी असे उपक्रम वरचेवर घेण्याची गरज आहे.
या उपक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक- शिक्षिकांनी केले.संस्थेचे अध्यक्ष मा.उदय परांजपे साहेब,उपाध्यक्ष विश्वास रावळ,सचिव जयंतीलाल शहा ,संचालक सुनिल रावळ, संचालिका. सौ. शहा भाभीयांनी सर्वाना आजी आजोबादिनाच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या उत्तम व निरोगी आरोग्याचे अभिष्टचिंतन केले.
या कार्यक्रमाचे आभार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर यांनी केले.सर्व उपस्थितांचे आभार मानले,व चहा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.