ताज्या घडामोडी

अस्पृश्यता निर्मूलन:::: एक यशस्वी चळवळ.. प्राचार्य डॉ अशोक राव ढगे

“अस्पृश्यता निर्मूलन:::: एक यशस्वी चळवळ””. प्राचार्य डॉ अशोक राव ढगे ९५११७७९१६८. .. आपल्या देशात अनेक रूढी राक्षसी स्वरूपात परंपरागत सुरू होत्या व आजही आहेत, तथापि अनेक समाज सुधारकांनी त्यांची निर्मूलन करण्यात यश मिळविले आहे राजा राम मोहन रॉय यांनी इंग्रज सरकारच्या काळात”सतीची चाल “”बंद करण्यात प्रयत्नांती यश मिळवले होते देशाला संतांची व समाज सुधारकांची चांगली देणगी आहे थोर संतांचे प्रयत्न व सत्वशील मार्गदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तथापि संतांच्या मावळ प्रयत्नातून फळ निष्पत्ती जड समाजात मंद गतीने होते असे आढळते मात्र महान सुधारकांनी केलेले प्रयत्न प्रभावी होतात लोकमान्य टिळक महात्मा गांधी महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज वीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा आढाव डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या धारदार कृतीने व आंदोलनाने अनेक समाज विघातक रूढी लोक पाहुण्यांमध्ये क्रांती केली आहे समाज रचनेमध्ये परंपरागत अस्पृश्यता एक भयंकर कलंक होता अस्पृश्यता निर्मूलनाचे काम महात्मा गांधींनी हाती घेतले व डॉक्टर आंबेडकरांनी त्याला समाजातून हद्दपार केले महात्मा गांधी देशभर स्वातंत्र्याचा लढा चालवत असताना त्यांचे लक्ष अस्पृश्यता निवारणाकडे कटाक्षाने होते एका गावात ते भाषण करत असताना त्यांचे भाषण चालू असताना काही लोक दूर उभे राहून झाडाखाली भाषण ऐकत होते गांधींनी विचारले हे लोक तिकडे दूर का उभे आहेत? इतरांनी सांगितले ते हरिजन आहेत गांधीजींनी खडसावून सांगितले ते जेथे उभे आहेत तिथे जाऊन मी भाषण करणार आहे यांना यायचे असेल त्यांनी यावे व बापूंनी झटपट कृती केल्यामुळे एकत्रित भाषण झाले सर्व भारतभर गांधी अस्पृश्यता निवारण चळवळ चालवत असताना मुंबईत आले होते त्यावेळी काही धनिक उद्योगपतींनी बापूंची भेट घेतली व सांगितले की आम्ही आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी निधी जमा करून लाखो रुपये देतो परंतु आपण अस्पृश्यता निर्मूलन चळवळ सोडून द्यावी व बंद करावी महात्मा गांधी रागवले व म्हणाले एक वेळ मी स्वातंत्र्य चळवळ सोडू शकतो परंतु अस्पृश्यता निवारण चळवळ सोडणार नाही महात्मा फुलेंनी समाज व्यवस्थेवर व भेदाभेदीवर घनाघाती टीका करून प्रभावी विचारांचा पाया उभा केला शाहू महाराजांनी आणि कृतिशील स्वतः जातीने लक्ष घालून उपक्रम राबवून अस्पृश्यता निर्मूलन करण्यात सिंहाचा वाटा उचलला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्रांती बरोबर समाज सुधारण्यासाठी व एकात्मतेसाठी अद्वितीय कार्य केले संत गाडगे महाराज महाराष्ट्र भर फिरताना समाजात एकोपा वाढावा जातीभेद दूर व्हावा यासाठी रात्रंदिवस झगडले जनजागृती बरोबर लोकशिक्षण झाल्यामुळे एकत्रित प्रयत्नांना अस्पृश्यता निर्मूलन हळूहळू यशस्वीपणे घडत गेले डॉक्टर बाबासाहेबांनी ओळखले की अस्पृश्यता निर्मूलन साठी कायद्याची गरज आहे आणि त्यामुळे त्यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी व हरिजन वरील अन्याय दूर करण्यासाठी**ॲट्रॉसिटी***या कायद्याचा संविधानात समावेश केला आज समाजामध्ये निरीक्षण करता असे अनुमान काढता येते की अस्पृश्यता निर्मूलन चळवळीला चांगली यश मिळाले आहे विविध प्रकारचा होणारा अन्याय यशस्वीपणे दूर झाला आहे अनेक गावात नदी काठावर एक गाव एक पाणवठा बाबा आढाव यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे सर्व मंदिरात सर्वांना प्रवेश खुले झाले आहेत जातिभेद संदर्भीय वाईट प्रथा युवकांनी गाडली आहे अस्पृश्यता निवारणामुळे अनेक चांगले फायदे झाले असून समाज समरसता व त्याचप्रमाणे एकात्मता वाढली आहे या चळवळीचे यश अभिमानास्पद असून देशाला गौरवशाली आहे एकरूप राष्ट्र प्रेमासाठी राष्ट्राचा आदर वाढविण्यासाठी ही चळवळ उपयुक्त ठरली आहे आज एक मानाचा तुरा देशाच्या मुकुटावर रोवला गेला आहे हे निर्विवाद सत्य!!!!

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??