एक ऑगस्ट हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करा … अशोक कांबळे मातंग समाजाचे जेष्ठ नेते

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीमहोत्सवानिमित्त सिल्लोड तालुक्यातील भवन येथे मातंग समाजाचे जेष्ठ नेते अशोकराव कांबळे तसेच ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक तथा मातंग समाजाचे जेष्ठ नेते सखाराम आहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड तालुक्यातील विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय क्षेत्रात काम करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी मातंग समाजाचे जेष्ठ नेते अशोक कांबळे यांनी समाजबांधवांना आवाहन केले की ,दि १ऑगस्ट २०२५ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असुन जयंतीमहोत्सव दिवाळी सण म्हणून सर्व समाजाने साजरा करावा.
ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक तथा मातंग समाजाचे जेष्ठ नेते सखाराम आहीरे यांनी सांगितले की एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे तसेच महीनाभर चालणाऱ्या जयंती महोत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सर्व समाज बांधवांनी दक्षता घ्यावी.
एक ऑगस्ट रोजी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिल्लोड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड शहरात संपन्न होत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीमहोत्सवाला सिल्लोड तालुक्यातील सकल मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी समाज बांधवांना केले.
यावेळी सदरील बैठकीसाठी विविध राजकीय व सामाजिक संघटने पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये मातंग समाजाचे जेष्ठ नेते अशोक कांबळे, जेष्ठ नेते सखाराम आहिरे, ए बी एस क्रांति सेनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव कांबळे, तालुकाध्यक्ष बाबुराव आहीरे,युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे,तालुका उपाध्यक्ष संजय कांबळे,सरपंच नामदेव खेत्रे,श्रीमती चंद्रकला कांबळे,सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ शिंदे,त्रिंबक शेजुळ,पुंजाराम कांबळे, वेणूताई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष साहेबराव दणके,त्रिंबक शेजुळ, गणेश शिंदे, किशोर भिसे,दिपक कांबळे,रवी कांबळे,राजु कांबळे,संजय कांबळे, नितीन दनके, दुर्गादास जाधव,विकास भिसे, संतोष खवळे, सुरेश अहिरे, आकाश गायकवाड, कृष्णा दणके,गजानन दणके, समाधान लोखंडे, विष्णू सौदागर, संतोष उन्होने, सचिन शिंदे, संजय सुरसे, एस व्हि साळवे, विठ्ठल कांबळे, कौतिक सौदागर, दिपक कांबळे, काकाजी साठे, राहुल कांबळे, कैलास कांबळे, पांडुरंग कांबळे, अशोक कांबळे, विजय काकफळे, गणपत गायकवाड, अजय कांबळे, शिवदास दणके, सचिन कांबळे, पंकज कांबळे, कचरू उन्होने, शाईनाथ उन्होने, किरण उन्होने आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.